मराठी बातम्या  /  क्रीडा  /  'मला वाटलं मी मरणार आहे...', Hima Das च्या आयुष्यातला भयानक प्रसंग
hima das
hima das
27 June 2022, 18:50 ISTRohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 18:50 IST
  • सततच्या दुखापतींमुळे हिमा दासच्या कारकिर्दीवर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हिमाला कोरोनाचीही लागण झाली होती.

भारताची अव्वल दर्जाची धावपटू हिमा दासच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला आहे. दुखापतींमुळे हिमाला टोकियो ऑलिम्पिकमध्येही स्थान मिळवता आले नव्हते. २२ वर्षीय हिमा दासने भाग घेतलेली शेवटची मोठी स्पर्धा ही २०१९ मध्ये दोहा येथील आशियाई चॅम्पियनशिप होती, तिथेही तिला पाठदुखीमुळे स्पर्धेच्या मध्यातूनच माघार घ्यावी लागली होती.

ट्रेंडिंग न्यूज

इतकेच नाही तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हिमा दासला कोरोनाचीही लागण झाली होती. हिमा दासने कोरोनाची लागण झाल्यानंतर आपल्या आयुष्यावर कसे परिणाम झाले ते सांगितले आहे. एकवेळ तर आता आपण जगू शकणार नाही, असेही हिमाला वाटले होते.

हिमाने एका वृत्तपत्राला या बाबतचा संपूर्ण घटना क्रम सांगितला आहे. ती म्हणाली की, 'मला कॅम्पमध्ये सामील झाल्यानंतर काही दिवसांनी कोविड झाला. खरे सांगायचे तर, त्यावेळी मी मरणार आहे, असेच वाटले होते. चौथ्या किंवा पाचव्या दिवशी मी मध्यरात्री अचानक उठले, तेव्हा मला श्वास घ्यायला खूपच अडचणी येत होत्या, तशा परिस्थितीतही मी उठले. खिडक्या आणि दरवाजे उघडले जेणेकरुन मी मेल्यावर कोणालाही दरवाजा तोडून आत यावे लागू नये. तो माझ्या आयुष्यातील अतिशय भयानक प्रकार होता, त्याबद्दल अनेकांना माहिती नाही".

तसेच, हिमा पुढे म्हणाली, 'त्यानंतर एक दिवशी माझ्या तोंडाला चव, वास आणि भूक काही तासांनी चमत्कारिकरित्या परत आली होती. हो तो चमत्कारच होता. तो दिवस गेला. मात्र, मला पुन्हा सामान्य स्थितीत परत येण्यासाठी तब्बल दोन महिने लागले. माझे वजन खूपच कमी झाले होते, तसेच माझ्या स्नायूंमधली ताकदही कमी झाली होती. जेव्हा मी पुन्हा व्यायाम सुरू केला तेव्हा मला नीट चालताही येत नव्हते. श्वास घेण्यासही त्रास होत होता. कोरोनाचा माझ्या फुफ्फुसांवर अधिक परिणाम झाला होता. डॉक्टरांनीही मला जास्त शारिरीक मेहनत करू नकोस असेही सांगितले होते".

दरम्यान, हिमा दासने नुकतेच इंटर-स्टेट चॅम्पियनशिपमध्ये १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. हिमा दासची नजर आता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरण्यावर असेल.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग