Pro Kabaddi League, Haryana Steelers vs Patna Pirates : हरियाणा स्टीलर्सने प्रो कबड्डी लीगचा अकरावा हंगाम जिंकला आहे. हरियाणा स्टीलर्सने पहिल्यांदाच प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद पटकावले. हरियाणा स्टीलर्सने अंतिम फेरीत पाटणा पायरेट्सचा पराभव करून इतिहास रचला.
वास्तविक, पटना पायरेट्सने आतापर्यंत विक्रमी ३ वेळा विजेतेपद पटकावले आहे, पण चौथ्यांदा विजेतेपद मिळवण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले.
याआधी गेल्या मोसमात हरियाणा स्टीलर्सचा अंतिम फेरीत पराभव झाला होता. त्यावेळी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र यावेळी हरियाणा स्टीलर्सच्या खेळाडूंनी कोणतीही चूक केली नाही.
हरियाणा स्टीलर्सने पाटणा पायरेट्सचा ३२-२३ असा पराभव केला. हरियाणा स्टीलर्सकडून विनयने ६ गुण मिळवले. तर पाटणा पायरेट्ससाठी देवांकने रेडिंगमध्ये ५ गुण मिळवले. याशिवाय मोहम्मदरेझा शादलू आणि शिवम पटारे यांनी हाय-५ मारला. त्याचवेळी मोहम्मदरेझा शादलू खेळाडू म्हणून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला.
खरे तर अंतिम सामन्याचे दडपण दोन्ही संघांच्या खेळाडूंवर स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे दोन्ही संघांचे गुण कमीच राहिले. पण हरियाणा स्टीलर्सच्या खेळाडूंनी विजयाची नोंद केल्यानंतर प्रचंड जल्लोष केला.
गेल्या मोसमात हरियाणा स्टीलर्सचा अंतिम फेरीत पुणेरी पलटणकडून पराभव झाला होता, मात्र यावेळी हरियाणा स्टीलर्सला विजेतेपद पटकावण्यात यश आले.
संबंधित बातम्या