मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Harmanpreet Kaur Catch : हरमनप्रीतचा अप्रतिम झेल; दोन बोटांमध्ये फसला चेंडू, एकदा पाहाच!
Harmanpreet Kaur Catch MI VS UPW
Harmanpreet Kaur Catch MI VS UPW

Harmanpreet Kaur Catch : हरमनप्रीतचा अप्रतिम झेल; दोन बोटांमध्ये फसला चेंडू, एकदा पाहाच!

18 March 2023, 20:26 ISTRohit Bibhishan Jetnavare

MI VS UPW Harmanpreet Kaur Catch : हरमनप्रीत कौरने यूपी वॉरियर्स विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात एक शानदार झेल पकडत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्याने स्लिपमध्ये हा झेल घेतला.

Harmanpreet Kaur Catch Video : महिला प्रीमियर लीगच्या १५व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पहिला पराभव पत्करावा लागला. रोमहर्षक लढतीत यूपी वॉरियर्सने मुंबईचा पाच गडी राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत १२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपीने १९.३ षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. मुंबईने या लीगमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले असून पाच जिंकले आहेत. हा त्याचा पहिला पराभव आहे. मुंबई इंडियन्स आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईने हा सामना गमावला आहे. संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने अप्रतिम झेल घेतला. या झेलचा व्हिडिओ WPL च्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. WPL ने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. यूपी वॉरियर्सची खेळाडू देविका वैद्य हिने जोराचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू तिच्या बॅटच्या बाहेरील काठाला लागला आणि स्लिपमध्ये हरमनप्रीत कौरच्या दिशेने गेला. चेंडू हरमनप्रीतपासून दूर होता, पण तिने डाईव्ह मारत एका हातात झेल पकडला. हा झेल तिच्या तीन बोटांमध्ये बसला.

यानंतर देविका वैद्य ७ चेंडूत १ धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. युपीच्या डावातील दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर ही घटना घडली. मुंबईकडून हेली मॅथ्यूज हे षटक टाकत होती.

युपी प्लेऑफच्या शर्यतीत कायम

यूपीचा ६ सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे. संघ सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत यूपीचा संघ अजूनही अबाधित आहे. मुंबई १० गुणांसह अव्वल तर दिल्ली कॅपिटल्स ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

यूपी आणि मुंबई या दोन्ही संघांना आता प्रत्येकी दोन सामने खेळायचे आहेत. यूपी संघाचा सामना २० मार्च रोजी गुजरात जायंट्स आणि २१ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सशी होईल. त्याचवेळी मुंबई संघाला २० मार्चला दिल्ली आणि २१ मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सामना करायचा आहे.