मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Haris Rauf-Muzna Malik: ते चुकून झालं... पत्नीसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हारिस रौफचा खुलासा

Haris Rauf-Muzna Malik: ते चुकून झालं... पत्नीसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हारिस रौफचा खुलासा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 29, 2022 04:36 PM IST

haris rauf wife muzna malik wedding: हारिसने त्याची क्लासमेट आणि गर्लफ्रेंड मुजना मलिकसोबत लग्न केले आहे. दोघांनी लग्नाचे फोटोशूटही केले आहे, जे प्रचंड व्हायरल झाले आहे. या प्रसंगाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये हरिस त्याच्या पत्नीसमोर हात जोडून उभा असल्याचे दिसत आहे.

Haris Rauf-Muzna Malik
Haris Rauf-Muzna Malik

Haris Rauf Muzna Malik: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने शनिवारी (२४ डिसेंबर) मॉडेल मुजना मसूद मलिकशी लग्न केले. या विवाहसोहळ्याला अनेक बडे लोक उपस्थित होते. या क्षणाचे काही अप्रतिम फोटो त्याने सोशल मीडियावरदेखील शेअर केले आहेत. लग्नाच्या काही दिवसानंतर एका फोटोवरुन हारिस रौफला खुलासा द्यावा लागला आहे.

२९ वर्षीय हरिसने त्याची क्लासमेट आणि गर्लफ्रेंड मुजना मलिकसोबत लग्न केले आहे. दोघांनी लग्नाचे फोटोशूटही केले आहे, जे प्रचंड व्हायरल झाले आहे. या प्रसंगाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये हरिस त्याच्या पत्नीसमोर हात जोडून उभा असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओवरून त्याला एका मुलीने प्रश्न विचारला आहे. त्यानंतर त्याला संबंधित व्हिडीओचा सविस्तर खुलासा करावा लागला आहे.

हारिसने दिलं उत्तर

वास्तविक, एका कार्यक्रमात मुलीने विचारले की, 'सर, फोटोशूटच्या वेळी तुम्ही पत्नीची माफी का मागत होता?' हा प्रश्न ऐकून हरिसने चेहरा लपवला आणि जोरजोरात हसायला लागला. यानंतर हरिस स्वत:ला सांभाळले आणि त्या उत्तर देताना म्हणाला की, 'यामध्ये माझी चूक नव्हती. जो शूटिंग करत होता त्याने चुकीचे रेकॉर्ड केले आहे".

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, हारिस आणि मुजना यांचे लग्न पार पडले आहे. पण रुखसती पुढच्या वर्षी होणार आहे. म्हणजेच मुजना एक वर्ष माहेरीच राहणार असून ती पुढच्या वर्षी आपल्या सासरी जाईल.

मुजना सोशल मीडियावर नाही

दरम्यान, अलीकडेच हारिस रौफला एका ट्विटमध्ये असाही खुलासा करावा लागला होता,की त्याची पत्नी मुझना मसूद मलिक सोशल मीडियावर नाही. तिचे कोणतेही ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंट नाही. हारिसने असा खुलासा केला होता कारण, दोघांचे लग्न झाल्यानंतर मुजनाच्या नावाने अनेक फेक अकाऊंट तयार करण्यात आले आहेत. त्यावरुन मुजनाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले जात आहेत.

WhatsApp channel