T20 विश्वचषकात भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. टीम इंडियाने आतापर्यंत आपल्या ४ सामन्यांपेकी ३ सामने जिंकले आहेत. अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकला सर्व सामन्यांसाठी प्लेईग ११ मध्ये स्थान देण्यात आले. मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये कार्तिकला आपले कौशल्य दाखवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे अनेक क्रिकेटपटूंनी त्याच्या जागी ऋषभ पंतला खेळवण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने मात्र, कार्तिकचा बचाव केला आहे. त्याने कार्तिकच्या कामगिरीवर टीका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. मात्र, कार्तिकलाही अद्याप वर्ल्डकपमध्ये आपली छाप पाडता आलेली नाही.
हरभजन सिंग एका स्पोर्ट्स चॅनलवर बोलताना म्हणाला की, 'जेव्हा दिनेश कार्तिक दुखापतग्रस्त झाला होता, तेव्हा मी पंतला खेळवा असे सांगितले होते. पण कार्तिक फिट असेल तर कार्तिकला संधी दिली पाहिजे. कारण तुम्ही त्याला फिनीशरच्या रोलसाठी घेऊन गेला आहात. जर पंतला संघात घेतले तर तुम्ही त्याला ज्या क्रमांकावर डीके खेळतो त्या क्रमांकावर खेळवणार आहात का?".
यावर अँकरने हरभजनला विचारले की, 'कार्तिक सलग तीन सामन्यात फ्लॉप झाला आहे. यावर हरभजनने देखील चांगले उत्तर दिले. तो म्हणाला की, “विश्वचषकात केवळ दिनेश कार्तिकच अपयशी ठरला नाही, इतरही खेळाडू आहेत ज्यांनी कमी धावा केल्या आहेत पण त्यांच्यावर टीका होत नाही. कारण ते मोठे खेळाडू आहेत. त्यांच्याबद्दल कुणी बोलत नाही. दिनेश कार्तिक ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो ती सर्वात कठीण गोष्ट आहे. युवराज आणि एमएस धोनीचे कौतुक करावे तितके कमी आहे. त्यांच्यानंतर तुम्हाला कार्तिक मिळाला आहे, त्याला थोडी संधी द्या”.
“त्या मुलाने (कार्तिक) खूप मेहनत घेतली आहे. धावा करुन इथपर्यंत आला आहे. फक्त तीन संधींनंतर असा विचार करू नका की तो फ्लॉप आहे. संधी समान असावी. वरील लोकांना जर सपोर्ट मिळत असेल तर खाली असलेल्यांनाही तो मिळावा, असेही भज्जी म्हणाला.
संबंधित बातम्या