मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs SL : पराभवानंतर हरभजन रोहित शर्मावर भडकला; BCCI ला विचारले तीन तिखट प्रश्न
harbhajan singh on rohit sharma captaincy
harbhajan singh on rohit sharma captaincy (HT)

IND vs SL : पराभवानंतर हरभजन रोहित शर्मावर भडकला; BCCI ला विचारले तीन तिखट प्रश्न

07 September 2022, 10:53 ISTAtik Sikandar Shaikh

India Vs Sri Lanka In Asia Cup 2022 : काल आशिया कप स्पर्धेत भारताचा श्रीलंकेकडून पराभव झाल्यानंतर माजी फिरकीपटू हरभजनसिंग चांगलाच संतापला आहे.

harbhajan singh on rohit sharma captaincy : काल आशिया कपच्या सुपर ४ च्या फेरीत भारताचा श्रीलंकेकडून पराभव झाला आहे. त्यामुळं भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये निराशा पसरली असून आता भारताचा माजी फिरकीपटू हरभजनसिंगनं रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्हं उपस्थित करत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) ला तीन तिखट प्रश्न विचारले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

श्रीलंकेनं भारताचा पराभव केल्यानंतर हरभजन सिंग यानं ट्विट करत लिहिलंय की, 'उमरान मलिक (जो १५० kmph वेगानं गोलंदाजी करतो), दीपक चाहर (जो स्विंग गोलंदाजी करण्यात माहिर आहे) आणि दिनेश कार्तिकला का खेळवण्यात येत नाहीये?, हे खेळाडूंमध्ये क्षमता नाहीये का? असे प्रश्न विचारत त्यानं भारताच्या पराभवाचं खापर बीसीसीआयवर फोडलं आहे. याशिवाय हरभजननं या वक्तव्यातून आशिया कपसाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंवरही प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.

दिनेश कार्तिकला केवळ एकाच सामन्यात खेळण्याची मिळाली संधी...

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकला खेळण्याची संधी देण्यात आली होती. याशिवाय त्याला हॉंगकॉंग आणि कालच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आलेली नव्हती. याशिवाय वेगवान गोलंदाज उमरान मलिकची आशिया कप स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर दीपक चाहरची आशिया कपसाठी निवड करण्यात आलेली आहे, मात्र त्याला अजून खेळण्याची संधी देण्यात आलेली नाही.

याआधी आशिया कपसाठी बीसीसीआयनं वेगवान गोलंदाज म्हणून आवेश खानची निवड केली होती. परंतु आजारपणामुळं त्याला खेळता आलं नव्हतं. त्यानंतर त्याच्या जागी दीपक चाहरचा संघात समावेश करण्यात आला. मात्र त्याला अंतिम ११ मध्ये स्थान मिळालेलं नव्हतं.

भारताचा स्पर्धेतील पुढील मार्ग खडतर...

आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून पराभव झाल्यानंतर आता स्पर्धेतील आव्हान कायम राखणं कठिण होणार आहे. कारण आता भारताचा अफगाणिस्तानविरुद्धचा एकच सामना उरलेला आहे. त्यामुळं आता श्रीलंकेनं पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला हरवलं तरच भारताचं आव्हान स्पर्धेतलं आव्हान कायम राहणार आहे.