IPL 2023: गुजरातचा संघ आज लव्हेंडर रंगाच्या जर्सीमध्ये; हार्दिक पांड्याने सांगितले कारण
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023: गुजरातचा संघ आज लव्हेंडर रंगाच्या जर्सीमध्ये; हार्दिक पांड्याने सांगितले कारण

IPL 2023: गुजरातचा संघ आज लव्हेंडर रंगाच्या जर्सीमध्ये; हार्दिक पांड्याने सांगितले कारण

May 15, 2023 08:26 PM IST

GT vs SRH: हैदराबादविरुद्ध सामन्यात गुजरातचा संघ लव्हेंडर रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरला आहे.

Gujarat Titans Jersey
Gujarat Titans Jersey

IPL 2023: गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात गुजरातच्या संघात दोन तर हैदराबादच्या संघात एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळाला. याशिवाय, गुजरातच्या संघाच्या जर्सीमध्येही बदल पाहायला मिळाला आहे. गुजरातचा संघ आज लव्हेंजर रंगाची जर्सी घालून मैदानात उतरला आहे. ही जर्सी घालून मैदानात उतरण्याचे कारणही गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने सांगितले आहे.

गुजरातच्या संघाने आज त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हैदराबादविरुद्ध सामन्यात वेगळ्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर नाणेफेकी दरम्यान रवी शास्त्री यांनी हार्दिक पांड्याला लव्हेंडर रंगाच्या जर्सी घालण्यामागचे कारण विचारले असता तो म्हणाला की, "कर्करोगाविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही आज लव्हेंडर रंगाची जर्सी घालून आम्ही मैदानात उतरतो आहोत."

आयपीएल २०११ मध्ये रॉयल चॅलेजर्सचा संघ हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरला होता. पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आरसीबीच्या संघाने हा निर्णय घेतला होता. तेव्हापासून आरसीबीचा संघ प्रत्येक हंगामात त्यांच्या होमग्राऊंडवर हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरतो.

हैदराबादविरुद्ध गुजरातची प्लेईंग इलेव्हन:

शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकिपर), साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, दासुन शनाका, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद.

गुजरातविरुद्ध हैदराबादची प्लेईंग इलेव्हन:

अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), अब्दुल समद, सनवीर सिंग, मयंक मार्कंडे, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारूकी, टी नटराजन.

Whats_app_banner
विभाग