मराठी बातम्या  /  क्रीडा  /  GG vs UPW Highlights : थरारक विजयासह युपीची प्लेऑफमध्ये एन्ट्री, गुजरात-आरसीबी स्पर्धेबाहेर

GG vs UPW Highlights : थरारक विजयासह युपीची प्लेऑफमध्ये एन्ट्री, गुजरात-आरसीबी स्पर्धेबाहेर

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 20, 2023 02:57 PM IST

GG vs UP Live Score : महिला प्रीमियर लीगचा १७ वा सामना आज (२० मार्च) गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स (GG VS UPW) यांच्यात झाला. हा सामना युपीने शेवटच्या षटकांत जिंकला.

GG vs UPW Live Score
GG vs UPW Live Score

WPL Live Cricket Score, GUJ vs UP Women’s Premier League 2023 : महिला प्रीमियर लीगचा १७ वा सामना आज (२० मार्च) गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स (GG VS UPW) यांच्यात होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो असा आहे. पराभूत होणाऱ्या संघाला स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका असेल. या सामन्यात गुजरातने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

GG vs UP WPL 2023 Score UPDATES

युपीचा शानदार विजय

महिला प्रीमियर लीगच्या १७व्या सामन्यात यूपी वॉरियर्सने गुजरात जायंट्सचा तीन विकेट्सनी पराभव केला. या विजयासह यूपी संघाने प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. त्याचबरोबर गुजरात जायंट्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ स्पर्धेतून गेले आहेत. या विजयासह यूपीचे सात सामन्यांतून आठ गुण झाले आहेत. त्याचबरोबर गुजरातचे आठ सामन्यांत सहा गुण आहेत. बंगळुरूचे सध्या सात सामन्यांनंतर चार गुण आहेत. या संघाने शेवटचा सामना जिंकला तरी ते जास्तीत जास्त सहा गुण मिळवू शकतील, यूपीशी बरोबरी करू शकणार नाहीत.

तर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ६ बाद १७८ धावा केल्या. दयालन हेमलताने ३३ चेंडूत ५७ धावा केल्या तर ऍशले गार्डनरने ३९ चेंडूत ६० धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपीने १९.५ षटकांत लक्ष्य गाठले. ताहिला मॅकग्राने ३८ चेंडूत ५७ धावा आणि ग्रेस हॅरिसने ४१ चेंडूत ७२ धावा केल्या.

GG vs UP Live Score : मॅकग्रा-हॅरिसने डाव सांभाळला

नऊ षटकांनंतर यूपी वॉरियर्सने तीन गडी गमावून ७७ धावा केल्या आहेत. सध्या ग्रेस हॅरिसने १० चेंडूत १३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ताहिला मॅकग्राने २४ चेंडूत ३९ धावा केल्या आहेत. यूपीला आता ६६ चेंडूत १०२ धावांची गरज आहे.

GG vs UP Live Score : यूपीला तिसरा धक्का

पाचव्या षटकात ३९ धावांवर यूपीला तिसरा धक्का बसला. देविका वैद्य सात धावा करून बाद झाली. तिला तनुजा कंवरने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सहा षटकांनंतर यूपीची धावसंख्या तीन बाद ५२ आहे. यूपीला सध्या ८४ चेंडूत १२७ धावांची गरज आहे. सध्या ताहिला मॅकग्रा आणि ग्रेस हॅरिस क्रीजवर आहेत. 

GG vs UP Live Score : यूपीला पहिला झटका 

दुसऱ्या ओव्हरमध्येच यूपीला १४ धावांवर पहिला धक्का बसला. कर्णधार अॅलिसा हिली आठ चेंडूत १२ धावा करून बाद झाली. तिला मोनिका पटेलने हरलीन देओलच्या हाती झेलबाद केले. दोन षटकांनंतर यूपीची धावसंख्या एका विकेटवर १४ धावा आहे. देविका वैद्य आणि किरण नवगिरे सध्या क्रीजवर आहेत.

GG vs UP Live Score : गुजरताच्या १७८ धावा

गुजरातने यूपीसमोर १७९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ६ बाद १७८ धावा केल्या. गुजरातची सुरुवात चांगली झाली. सोफिया डंकले आणि एल वोल्वार्ड यांनी पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. वोल्वार्डने १७ आणि डंकलेने २३ धावा केल्या. हरलीन देओलला केवळ चार धावा करता आल्या. यानंतर दयालन हेमलता आणि अॅश्ले गार्डनर यांनी ६१ चेंडूत ९३ धावांची भागीदारी केली.

हेमलता ३३ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावा करून बाद झाली. तर गार्डनर ३९ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६० धावा करून बाद झाली. दोघींनाही पार्श्वी चोप्राने बाद केले. 

यानंतर अश्विनी कुमारी ५ आणि सुषमा वर्मा ८ धावा करून नाबाद राहिल्या. युपीकडून पार्श्वी आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी अंजली सरवानी आणि सोफी एक्लेस्टोनला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

GG vs UP Live Score : हेमलता आणि गार्डनर क्रीजवर

नऊ षटकांनंतर गुजरातने तीन बाद ६७ धावा केल्या आहेत. सध्या दयालन हेमलता १२ चेंडूत १८ धावा तर ऍशले गार्डनर ९ चेंडूत ४ धावांवर फलंदाजी करत आहे. 

GG vs UP Live Score : गुजरातच्या तीन विकेट पडल्या

सहा षटकांनंतर गुजरातची धावसंख्या तीन बाद ५० धावा आहे. गुजरात संघाला सहाव्या षटकात दोन धक्के बसले. राजेश्वरी गायकवाडने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर सोफिया डंकलेला अंजली सरवानीकडे झेलबाद केले. डंकले १३ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने २३ धावा करू शकली. यानंतर हरलीन देओलला शेवटच्या चेंडूवर सिमरन शेखकरवी झेलबाद केले. हरलीनला सात चेंडूंत चार धावा करता आल्या. सध्या पार्श्वी चोप्रा आणि डी हेमलता क्रीजवर आहेत.

GG vs UP Live Score : पहिला धक्का गुजरातला

गुजरातला पहिला धक्का पाचव्या षटकात ४१ धावांवर बसला. अंजली सरवानीने एल वोल्वार्डला क्लीन बोल्ड केले. वोल्वार्डला १३ चेंडूत १७ धावा करता आल्या. सध्या हरलीन देओल आणि सोफिया डंकले क्रीजवर आहेत.

GG vs UP Live Score : गुजरातची वेगवान सुरुवात

गुजरातने दोन षटकांनंतर एकही विकेट न गमावता २६ धावा केल्या आहेत. सध्या, एल वोल्वार्ड पाच चेंडूत १० धावा आणि सोफिया डंकले सात चेंडूत १५ धावा करून क्रीजवर आहे.

GG vs UP Live Score : दोन्ही संघ

गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन)

सोफिया डंकले, लॉरा वोल्वार्ड, अॅश्लेह गार्डनर, दयालन हेमलता, हरलीन देओल, सुषमा वर्मा (डब्ल्यू), स्नेह राणा (कर्णधार), किम गर्थ, मोनिका पटेल, तनुजा कंवर, अश्विनी कुमारी

यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन):

देविका वैद्य, अॅलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), किरण नवगिरे, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, सिमरन शेख, पार्शवी चोप्रा, अंजली सरवाणी, राजेश्वरी गायकवाड

GG vs UP Live Score : गुजरातची प्रथम फलंदाजी

या सामन्यात गुजरातने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातने एस मेघनाच्या जागी मोनिका पटेलचा संघात समावेश केला आहे. त्याच वेळी, यूपीची कर्णधार अॅलिसा हिलीने प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

GG vs UP Live Score : युपीला एका विजयाची गरज

यूपी वॉरियर्सचे सहा सामने तीन विजय आणि तीन पराभवांसह सहा गुण आहेत. गुणतालिकेत संघ तिसऱ्या स्थानावर आहे. एक सामना जिंकताच यूपीचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात संघ बाहेर होतील. 

WhatsApp channel