Shubman Gill Century : शुभमनच्या शतकाचा 'सारा' जमाना दीवाना, सोशल मीडियावरील या मजेशीर प्रतिक्रिया पाहाच!-gt vs mi qualifier 2 shubman gill century in ipl fans reacted after hits 3rd century in ipl 2023 ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shubman Gill Century : शुभमनच्या शतकाचा 'सारा' जमाना दीवाना, सोशल मीडियावरील या मजेशीर प्रतिक्रिया पाहाच!

Shubman Gill Century : शुभमनच्या शतकाचा 'सारा' जमाना दीवाना, सोशल मीडियावरील या मजेशीर प्रतिक्रिया पाहाच!

May 26, 2023 10:45 PM IST

gt vs mi qualifier 2 shubman gill century : गुजरातकडून सलामीला आलेला फलंदाज शुभमन गिलने सामन्यात शानदार फलंदाजी केली. शुभमनने आधी ३२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यानंतर पुढील ५० धावा करण्यासाठी केवळ १७ चेंडू खेळले गेले.

shubman gill century
shubman gill century

आयपीएल 2023 चा दुसरा क्वालिफायर सामना आज शुक्रवारी (२६ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात गुजराच्या शुभमन गिलने वादळी शतक झळकावले (shubman gill vs mumbai indians century) आहे. त्याने अवघ्या ४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

शुभमन गिलचे हे आयपीएलच्या चालू हंगामातील तिसरे शतक आहे. त्याने ६० चेंडूत १२९ धावा केल्या. गिलने या मोसमाच्या सुरुवातीला साखळी फेरीत सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शतके झळकावली होती. गिलने आपल्या खेळीत १० षटकार आणि ७ चौकार लगावले. शुभमन गिलच्या या शतकाच्या जोरावरच गुजरातने २० षटकात २३३ धावा केल्या. मुंबईला विजयासाठी २३४ धावा करायच्या आहेत.

गुजरातकडून सलामीला आलेला फलंदाज शुभमन गिलने सामन्यात शानदार फलंदाजी केली. शुभमनने आधी ३२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यानंतर पुढील ५० धावा करण्यासाठी केवळ १७ चेंडू खेळले गेले.

यासह, तो या स्पर्धेच्या एकाच सत्रात ८०० हून अधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. आयपीएलच्या एका मोसमात फक्त विराट कोहली आणि जोस बटलर यांनाच ८०० हून अधिक धावा करता आल्या आहेत. याशिवाय शुभमन गिल आयपीएलच्या प्लेऑफमध्ये शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. शुभमन गिलने आयपीएलमध्ये भारतीयाकडून दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या केली.

चाहत्यांनी सोशल मीडियावर अभिनंदन केले

 

शुभमन गिलचे आयपीएल कारकिर्दीतील आणि चालू हंगामातील हे तिसरे शतक आहे. त्याने मागील ४ डावात ३ शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर गिलच्या या शतकावर चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Whats_app_banner