मराठी बातम्या  /  Sports  /  Golf Milkha Singh Grandson &Amp; Son Of Golfer Jeev Milkha Singh Harjai Wins Us Kids European Championship 2023

Golf : मिल्खा सिंग यांच्या नातवाने इतिहास रचला, १३व्या वर्षी जिंकली पहिली आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धा

Harjai Milkha Singh
Harjai Milkha Singh
Rohit Bibhishan Jetnavare • HT Marathi
Jun 03, 2023 11:35 AM IST

Harjai Milkha Singh US Kids European Championship : मिल्खा सिंग (Milkha Singh) यांचा नातू आणि पद्मश्री गोल्फपटू जीव मिल्खा सिंग यांचा मुलगा हरजय मिल्खा सिंग याने आजोबा आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. हरजयने अंडर-13 यूएस किड्स युरोपियन चॅम्पियनशिप जिंकली आहे.

Harjai Milkha won US Kids European Championship 2023 : मिल्खा सिंग यांचा नातू आणि गोल्फपटू जीव मिल्खा सिंग यांचा मुलगा १३ वर्षीय हरजय मिल्खा सिंग याने गोल्फमध्ये इतिहास रचला आहे. हरजयने अंडर-13 यूएस किड्स युरोपियन चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. फायनलमध्ये हरजयचा एकूण स्कोअर 3-अंडर 69 असा राहिला. हरजयने जॉर्डन बोथाचा दोन शॉटच्या आघाडीसह पराभव केला.

ट्रेंडिंग न्यूज

विशेष म्हणजे, २०१२ मध्ये हरजयचे वडील जीव मिल्खा सिंग यांनीदेखील स्कॉटलंडमधील प्रतिष्ठित स्कॉटिश ओपन गोल्फ ही स्पर्धा जिंकली होती.

हरजयचे आजोबा मिल्खा सिंग यांनी कार्डिफ (वेल्स) येथे १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशाचे पहिले ऍथलेटिक्स सुवर्णपदक जिंकले होते. जीव मिल्खा सिंग यांनीदेखील गोल्फच्या अनेक युरोपियन, जपान आणि आशियाई स्पर्धा जिंकल्या आहेत.

विजयाची ट्रॉफी आजी-आजोबांना समर्पित

या ऐतिहासिकविजयानंतर हरजय मिल्खा म्हणाला की, “हा आपल्या आयुष्यातील महान क्षण आहे. ही ट्रॉफी दिवंगत आजी निर्मला मिल्खा सिंग आणि आजोबा सरदार मिल्खा सिंग यांना समर्पित केली. त्यांचा नातू असल्याचा अभिमान आहे. दोघेही हे जग सोडून कायमचे गेले, पण ते कुठेही असले तरी त्यांना माझा अभिमान वाटत असेल”.

वडील देतात प्रशिक्षण

हरजय मिल्खा सिंग सेक्टर-२६ येथील स्ट्रॉबेरी फील्ड स्कूलमध्ये आठवीत शिकतो. १३ वर्षांच्या हरजयने चंदीगड गोल्फ क्लबमधून आपल्या गोल्फ करिअरची सुरुवात केली. वडील जीव मिल्खा सिंग आणि आजोबा मिल्खा सिंग यांच्या प्रेरणेने हरजयने गोल्फ खेळायला सुरुवात केली. वडील जीव मिल्खा सिंग जेव्हा जेव्हा भारतात असतात तेव्हा ते मुलगा हरजयला त्यांच्यासोबत गोल्फ कोर्सवर प्रशिक्षण देतात.

WhatsApp channel

विभाग