Arshad Nadeem : सरावासाठी धड भाला नव्हता, वर्गणीच्या पैशांवर ऑलिम्पिकला गेला; अर्शद नदीमची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी-gold medal winner arshad nadeem struggle story for new javelin in neeraj chopra also concerned arshad nadeem life story ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Arshad Nadeem : सरावासाठी धड भाला नव्हता, वर्गणीच्या पैशांवर ऑलिम्पिकला गेला; अर्शद नदीमची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी

Arshad Nadeem : सरावासाठी धड भाला नव्हता, वर्गणीच्या पैशांवर ऑलिम्पिकला गेला; अर्शद नदीमची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी

Aug 09, 2024 12:29 PM IST

अर्शदचे वडील मजूर आहेत आणि त्यांनी अर्शदला गावातील लोकांकडून वर्गणी मागून प्रशिक्षण दिले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अर्शदची थेट स्पर्धा भारताच्या नीरज चोप्राशी होती. नीरजने रौप्य पदक जिंकले आहे.

खेळण्यायोग्य भाला नव्हता, वर्गणीच्या पैशांवर ऑलिम्पिकला गेला; अर्शद नदीमची ह्रदय पिळवटून टाकणारी कहाणी
खेळण्यायोग्य भाला नव्हता, वर्गणीच्या पैशांवर ऑलिम्पिकला गेला; अर्शद नदीमची ह्रदय पिळवटून टाकणारी कहाणी (AFP)

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने इतिहास रचला. त्याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. अर्शदसाठी आतापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. यासोबतच तो गरिबीशी झगडत आहे.

अर्शदचे वडील मजूर आहेत आणि त्यांनी अर्शदला गावातील लोकांकडून वर्गणी मागून प्रशिक्षण दिले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अर्शदची थेट स्पर्धा भारताच्या नीरज चोप्राशी होती. नीरजने रौप्य पदक जिंकले आहे.

नदीमकडे चांगला भालाही नव्हता

नदीमने पाकिस्तानला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. पण नदीमसाठी ऑलिम्पिकचा मार्ग सोपा राहिलेला नाही. सुरुवातीच्या काळात त्याच्याकडे चांगला भालाही नव्हता. नदीमने या वर्षाच्या सुरुवातीला चांगला भाला भेट देण्याचे आवाहन केले होते.

सुमारे ७ ते ८ वर्षांपासून तोच भाला वापरत असल्याचे अर्शदने सांगितले होते. तो भाला उच्चस्तरीय प्रशिक्षणासाठी योग्य नव्हता.

तेव्हा अर्शद म्हणाला होता, भाला खराब झाला आहे आणि मी राष्ट्रीय महासंघ आणि माझ्या प्रशिक्षकाला पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी याबद्दल काहीतरी करण्यास सांगितले आहे. जेव्हा मी २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली तेव्हा मला तो भाला मिळाला. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या तयारीत असलेल्या खेळाडूंना प्रशिक्षणाची संपूर्ण व्यवस्था आणि उपकरणे आवश्यक असतात.

नीरजही निराश झाला होता

नीरज चोप्राला जेव्हा त्याचा मित्र नदीमबद्दल कळले तेव्हा तोही निराश झाला. चोप्रा म्हणाला, नवीन भाला मिळविण्यासाठी तो संघर्ष करत आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्याची प्रतिष्ठा पाहता हा फार मोठा मुद्दा नसावा.

नदीमच्या वडिलांनी लोकांकडून पैसे घेऊन ट्रेनिंग दिली

नदीमचे वडील मजुरीचे काम करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नदीमच्या ट्रेनिंगसाठी त्यांनी सुरुवातीला गावातील लोकांकडून वर्गणी घेतली होती. नदीमचे वडील त्याच्या सुवर्णपदकामुळे खूप खूश आहेत.

अर्शद नदीमचे वडील मोहम्मद अशरफ म्हणाले, "बहुतेक लोकांना माहित नाही की नदीमला इथपर्यंत कसा पोहोचला. आमच्या गावातील लोकांनी आणि नातेवाईकांनी सुरुवातीला पैसे देऊन नदीमला प्रशिक्षण दिले. त्याच्या प्रवासाचा खर्चही उचलला. आजपर्यंत मी फक्त मजूर म्हणून काम केले आहे.

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याने ऑलिम्पिक विक्रमही केला. अर्शदने ९२.९७ मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली. भारताच्या नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकले. त्याने ८९.४५ मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली. ग्रेनेडाच्या पीटर अँडरसनने कांस्यपदक जिंकले.

भालाफेकमध्ये बहुतेक चाहत्यांच्या नजरा नीरज आणि नदीमवर होत्या. मात्र यावेळी नदीमने सुवर्ण तर नीरजला केवळ रौप्य पदक मिळाले.

नदीमने दोनदा ९० प्लस मीटर भाला फेकला

अंतिम सामन्यात नदीमची सुरुवात खराब झाली होती. पहिल्याच प्रयत्नात त्याचा रनअप चांगला नव्हतीा. यामुळे त्याने फाऊल केले पण नंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने ९२.९७ मीटर भाला फेकून ऑलिम्पिक विक्रम मोडला. यानंतर अखेरच्या प्रयत्नातही नदीमने ९० मीटरचा टप्पा पार केला.