फ्रान्सचा पोल व्हॉल्ट अॅथलीट अँथनी एमिराती एका विचित्र कारणामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कदाचित सुवर्णपदक जिंकू शकणार नाही, परंतु त्याला २.५ लाख यूएस डॉलर्सची ऑफर मिळाली आहे. भारतीय चलनात ही रक्कम २ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
वास्तविक, २१ वर्षीय अँथनी एमिराती याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याच्या प्रायव्हेट पार्ट्सच्या धडकेने क्रॉसबार खाली पडला.
यानंतर आता हा व्हिडीओ पाहून एका प्रौढ वेबसाईटने अँथनी एमिरातीला त्याचे पुरुषत्व दाखवण्यासाठी २.५ लाख अमेरिकन डॉलर्सची ऑफर दिली आहे. या प्रौढ वेबसाइटच्या उपाध्यक्षांनी या ऑफरबद्दल औपचारिक विधान देखील जारी केले आहे.
अमेरिकन मीडिया कंपनी TMZ च्या मते, या फ्रेंच ॲथलीटला ६० मिनिटांच्या वेब कॅम शोसाठी प्रौढ वेबसाइटद्वारे खूप पैसे दिले जाऊ शकतात. ६० मिनिटांच्या या शोमध्ये त्यांना त्यांचे प्रायव्हेट पार्ट कॅमेऱ्यासमोर दाखवावे लागणार आहेत. अँथनी ५.७० मीटर उंचीवर असलेला क्रॉस बार ओलांडण्याचा प्रयत्न करत होता.
त्याने योग्य टेक्निकने क्रॉसबार ओलांडलाही होता, मात्र त्याच्या प्रायव्हेट पार्टमुळे त्याला निराशेला सामोरे जावे लागले. क्रॉस खाली पडला आणि फ्रान्सचा अँथनी या स्पर्धेत १२ व्या क्रमांकावर आला.
१२ व्या स्थानामुळे अँथनी खूप निराश झाला कारण तो अंतिम फेरीत जाण्याच्या दावेदारांपैकी एक मानला जात होता. याआधी त्याने २०२२ अंडर-20 जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
त्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. दरम्यान, तो त्याच्या पहिल्या ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. पणे या विचित्र घटनेने तो नक्कीच मोठा स्टार बनला आहे.