मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ‘चला तो चांद तक, नहीं तो…’ पाकच्या माजी कर्णधाराने उडवली पंतची खिल्ली

‘चला तो चांद तक, नहीं तो…’ पाकच्या माजी कर्णधाराने उडवली पंतची खिल्ली

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 19, 2022 06:47 PM IST

रिषभ पंत आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळताना दिसणार आहे. त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे.

pant
pant

रिषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद शतक झळकावत टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला. त्यामुळे भारताने एकदिवसीय मालिकेत इंग्लंडला २-१ ने पराभूत केले. तेव्हापासून पंतचे जगभरातून कौतुक होत आहे. मात्र, पंतची ही स्तुती पाकिस्तानला आवडलेली नाही. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाची खिल्ली उडवली आहे. 

पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफ त्याच्या यूट्यूब चॅनल 'कॉट बिहाइंड'मध्ये म्हणाला की, 'पंतने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाजांना शानदार खेळला. पण. 'पंत का चला तो चांद तक, नहीं तो शाम तक' हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लिश यष्टीरक्षक जोस बटलरने पंतचा स्टंपिंगचा चान्स सोडला. त्यामुळेच त्याला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली'.

मात्र, नंतर लतीफने पंतचे कौतुकही केले. तो म्हणाला, ‘जीवदान मिळाल्यानंतर पंतची फलंदाजी चमकदार होती. विशेषत: वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याने शानदार फटके मारले’.

लतीफ पुढे म्हणाला ‘कधी कधी तो लवकर आऊट झाल्यावर लोक त्याच्या बॅटिंगवर प्रश्न उपस्थित करतात. पण कधी-कधी तो अशा पद्धतीने बॅटिंग करतो की कोणीही त्याची नक्कल करू शकत नाही. म्हणूनच मी वारंवार सांगितले आहे की तो यष्टिरक्षकांचा ब्रायन लारा आहे आणि त्याने इंग्लंडविरुद्ध हे सिद्ध केले आहे’. 

दरम्यान, रिषभ पंत आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळताना दिसणार आहे. त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. २२ जुलैपासून वेस्ट इंडिज मालिका सुरू होणार आहे. पहिले तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील. त्यानंतर टी-20 मालिका सुरू होईल. शिखर धवन वनडेमध्ये तर रोहित शर्मा टी-२०मध्ये कर्णधारपद भूषवणार आहे.

WhatsApp channel