मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sarfaraz Ahmed vs Mohammad Rizwan: सर्फराजला कधीच संघात येऊ देणार नाही, रिझवानचं वक्तव्य लीक
Sarfaraz Ahmed vs Mohammad Rizwan
Sarfaraz Ahmed vs Mohammad Rizwan

Sarfaraz Ahmed vs Mohammad Rizwan: सर्फराजला कधीच संघात येऊ देणार नाही, रिझवानचं वक्तव्य लीक

22 September 2022, 15:08 ISTRohit Bibhishan Jetnavare

Sikander Bakht on Sarfaraz Ahmed & Mohammad Rizwan: सर्फराज अहमद गेल्या १० महिन्यांपासून पाकिस्तानच्या संघातून बाहेर आहे. त्याने २२ नोव्हेंबर २०२१ रोजी बांगलादेश विरुद्धच्या शेवटचा T20 सामना खेळला होता. तसेत, त्याला कसोटी सामने खेळून साडेतीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमद बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे. अलीकडेच त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे टी-20 विश्वचषक संघात त्याची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तसे झाले नाही. तो अजूनही संघाबाहेरच आहे. मात्र, अशातच आता पाकिस्तानचे माजी गोलंदाज सिकंदर बख्तने याबाबतीत एक मोठा दावा केला आहे. सर्फराज अहमद पाकिस्तानच्या संघात कधीच परत येऊ शकणार नाही, असे बख्त यांनी म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सिकंदर बख्त काय म्हणाले

सिकंदर बख्त यांनी पाकिस्तानी चॅनल जिओ सुपरशी बोलताना सर्फराजच्या क्रिकेट करिअरबाबत भाकीत केले आहे. ते म्हणाले की, 'सर्फराज आता पाकिस्तानकडून कधीही खेळू शकणार नाही. कारण पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिजवानने सर्फराजला संघात परत येऊ देणार नसल्याचे म्हटले आहे. आपली क्रिकेट कम्युनिटी खूपच लहान आहे. त्यामुळे अशा बाबी लपून राहत नाहीत", असेही बख्त म्हणाले.

सर्फराजने रिजवानला खेळू दिले नव्हते

सोबतच सिकंदर बख्त पुढे म्हणाले की, ‘एका क्रिकेटरने माझ्यासोबत एक कार्यक्रम केला होता. त्यात त्याने मला सांगितले की. 'रिजवान म्हणाला होता, 'मी सर्फराजला कधीच संघात येऊ देणार नाही' कारण सर्फराज संघात असताना असताना त्याने रिझवानला खेळू दिले नव्हते. आता उलटे घडत आहे".

रिझवान सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानसाठी महत्त्वाचा खेळाडू

मोहम्मद रिझवानने एप्रिल २०१५ मध्ये पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो संघातून आत-बाहेर होत राहिला. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर त्याचे संघातील स्थान निश्चित झाले. सध्या क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये तो पाकिस्तानसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे.

सर्फराजच्या पाच हजारांहून अधिक धावा

सरफराज अहमद गेल्या १० महिन्यांपासून पाकिस्तानच्या संघातून बाहेर आहे. त्याने २२ नोव्हेंबर २०२१ रोजी बांगलादेश विरुद्धच्या शेवटचा T20 सामना खेळला होता. तसेत, त्याला कसोटी सामने खेळून साडेतीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. सर्फराजच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ हजारांहून अधिक धावा आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीत ५ शतकेही झळकावली आहेत.