मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sachin - Dhoni: सचिन आणि धोनी टेनिस कोर्टवर, 'या' व्हायरल फोटोमागचं रहस्य काय?

Sachin - Dhoni: सचिन आणि धोनी टेनिस कोर्टवर, 'या' व्हायरल फोटोमागचं रहस्य काय?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 06, 2022 05:50 PM IST

Sachin Tendulkar & MS Dhoni Plays Tennis: धोनी आणि सचिन टेनिस खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. दोन्ही माजी भारतीय खेळाडूंचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडल्याचे दिसत आहे.

Sachin - Dhoni
Sachin - Dhoni

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खरंतर धोनी आणि सचिन हे दोन्ही भारतीय दिग्गज टेनिस कोर्टवर दिसत आहेत. हे दोघे एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी टेनिस कोर्टवर उतरले होते.

दरम्यान, धोनी आणि सचिन टेनिस खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. दोन्ही माजी भारतीय खेळाडूंचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडल्याचे दिसत आहे.

महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर हे क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय खेळाडू मानले जातात. भारताव्यतिरिक्त या दोन्ही खेळाडूंची फॅन फॉलोइंग परदेशातही मोठ्या प्रमाणात आहे. अलीकडेच धोनी यूएस ओपनचा आनंद लुटताना दिसला होता. याशिवाय काही दिवसांपूर्वी तो महान अष्टपैलू कपिल देव यांच्यासोबत गोल्फ कोर्समध्येही दिसला होता. तसेच, सचिनदेखील सातत्याने ग्रँडस्लॅम स्पर्धेचा आनंद लुटताना दिसतो. तो अनेकदा विम्बल्डनच्या व्हीआयपी प्रेक्षक गॅलरीत दिसला आहे.

दरम्यान, यापूर्वी सचिन तेंडुलकर रोड सेफ्टी लीगमध्ये खेळताना दिसला होता. रोड सेफ्टी लीगमध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली इंडिया लिजेंड्स यंदाचा चॅम्पियन बनला आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या