पीआर श्रीजेशसारखं कुणीच नाही, १८ वर्षे भारताची भिंत बनून राहिला, ध्यानचंद यांच्यानंतर पद्मभुषण मिळणारा दुसराच हॉकीपटू
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  पीआर श्रीजेशसारखं कुणीच नाही, १८ वर्षे भारताची भिंत बनून राहिला, ध्यानचंद यांच्यानंतर पद्मभुषण मिळणारा दुसराच हॉकीपटू

पीआर श्रीजेशसारखं कुणीच नाही, १८ वर्षे भारताची भिंत बनून राहिला, ध्यानचंद यांच्यानंतर पद्मभुषण मिळणारा दुसराच हॉकीपटू

Jan 26, 2025 05:31 PM IST

PR Sreejesh Padma Bhushan Award : पीआर श्रीजेशसाठी 'मोस्ट लाइकेबल ॲथलीट' असे विशेषण वापरले जाते. याचा अर्थ सर्वांचा आवडता ॲथलीट असा होतो.

पीआर श्रीजेशसारखं कुणीच नाही, १८ वर्षे भारताची भिंत बनून राहिला, ध्यानचंद यांच्यानंतर पद्मभुषण मिळणारा दुसराच हॉकीपटू
पीआर श्रीजेशसारखं कुणीच नाही, १८ वर्षे भारताची भिंत बनून राहिला, ध्यानचंद यांच्यानंतर पद्मभुषण मिळणारा दुसराच हॉकीपटू

Hockey Player PR Sreejesh Padma Bhushan Award : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले. या विजयात गोलकीपर पीआर श्रीजेश याचा सिंहाचा वाटा होता. या ऐतिहासिक विजयानंतर श्रीजेशने आपल्या १८ वर्षांच्या हॉकी कारकिर्दीला निरोप दिला.

कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा २-१ असा पराभव केला होता. भारतीय हॉकी संघाने सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. यापूर्वी त्याने टोकियो ऑलिम्पिक (२०२०) मध्येही ही कामगिरी केली होती.

दरम्यान, पीआर श्रीजेशसाठी 'मोस्ट लाइकेबल ॲथलीट' असे विशेषण वापरले जाते. याचा अर्थ सर्वांचा मोस्ट फेव्हरेट ॲथलीट असा होतो.

श्रीजेशला पद्मभुषण मिळणार

सध्याच्या भारतीय हॉकी संघामध्ये पीआर श्रीजेशसारखा कोणीच नाही, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्याच पीआर श्रीजेश याचा भारत  सरकारने आता गौरव केला आहे. श्रीजेशला पद्मभुषण पुरस्कार मिळणार आहे. 

विशेष म्हणजे, मेजर ध्यानचंद (१९५६) यांच्यानंतर पद्मभूषण पुरस्कार प्राप्त करणारा श्रीजेश केवळ दुसराच हॉकीपटू आहे.

पीआर श्रीजेश याने १८ वर्षे भारतीय हॉकीची सेवा केली आहे. त्याला भारताची मजबूत भिंत म्हणूनही ओळखले जाते. 

ग्रेस मार्क्ससाठी श्रीजेशने हॉकीला सुरुवात केली!

पीआर श्रीजेशचा हॉकीचा प्रवास खूपच रंजक राहिला आहे. बोर्डाच्या परीक्षेत ग्रेस मार्क्स मिळावेत म्हणून श्रीजेशने हॉकी खेळायला सुरुवात केली. श्रीजेशने भारतीय क्रिकेट संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला होता.

श्रीजेश म्हणाला होता,की 'जर तुम्ही केरळसाठी अंडर-१४ किंवा अंडर-१७ स्तरावर खेळलात तर बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला ग्रेस मार्क्स मिळतात. हा खेळ तुम्हाला वाकून खेळायचा असायतो. माझ्यासाठी ते अवघड होते. 

श्रीजेश गोलकीपरच का बनला?

शिवाय, तुम्हाला सतत धावावे लागते. माझे वजन थोडे जास्त होते आणि मला धावणे अजिबात आवडत नव्हते. मी गोलकीपरला पूर्ण किट घालून एका कोपऱ्यात उभे राहून चेंडूला किक मारताना पाहिले. मला वाटले की ते खूप मजेदार आहे कारण ते काहीही करत नव्हते. ते चालतही नव्हते. ते फक्त पॅड घालतात आणि चेंडूला लाथ मारतात. त्यामुळे, मला वाटले की ही माझ्यासाठी योग्य परिस्थिती आहे. कारण तुम्हाला धावण्याचीही गरज नाही.

श्रीजेशची आंतरराष्ट्रीय हॉकी कारकीर्द 

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ही त्याची शेवटची स्पर्धा होती. भारतासाठी ३३६ सामने खेळणाऱ्या श्रीजेशचे हे चौथे ऑलिम्पिक होते. राष्ट्रकुल खेळ, आशियाई खेळ आणि विश्वचषक खेळलेल्या ३६ वर्षीय श्रीजेशने २०२१ मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट गोलकीपिंगसह भारताला कांस्यपदक जिंकून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती.

पी आर श्रीजेश हा भारतीय संघाचा सदस्य होता ज्याने २०१४ आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक आणि २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. 

तो २०१८ मधील आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा संयुक्त-विजेता संघ, भुवनेश्वरमधील २०१९ FIH मेन्स सीरीज सुवर्णपदक विजेता संघ आणि बर्मिंगहॅम २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्य पदक विजेत्या संघाचा सदस्य होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या