कार्तिक अन् डिव्हिलियर्स सेम टू सेम, ‘या’ दिग्गजानं सांगितली दोघांमधील समानता
दिनेश कार्तिकने (dinesh karthik) आयपीएल २०२२ (ipl 2022) या मोसमात १६ सामन्यांमध्ये ३३० धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट १८३.३३ इतका तगडा होता. या कामगिरीच्या जोरावर कार्तिक वयाच्या ३७ व्या वर्षी टीम इंडियात दणक्यात पुनरागमन केले.
दिनेश कार्तिकसाठी हे वर्ष आतापर्यंत तरी खूप चांगले ठरले आहे. आयपीएल २०२२ मध्ये शानदार फलंदाजी केल्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही आपला ठसा उमटवला. अनेक माजी क्रिकेटपटू त्याच्या फलंदाजीच्या शैलीमुळे त्याचे फॅन झाले आहेत. या यादीत आता इरफान पठाणचाही समावेश झाला आहे. इरफानने दिनेश कार्तिकच्या स्फोटक फलंदाजीची तुलना एबी डिव्हिलियर्सशी केली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
इरफान म्हणाला, "इतकी मोठी रेंज असलेला खेळाडू तुम्हाला सापडणार नाही. मी त्याची (दिनेश कार्तिक) तुलना एबी डिव्हिलियर्सशी गुणवत्तेवरुन करणार नाही, परंतु त्याची मोठे फटके खेळण्याची रेंज ही डिव्हिलियर्सशी मिळतीजुळती नक्कीच आहे. तो तुम्हाला स्वीप मारू शकतो, तो स्विच हिट मारू शकतो, त्याच्याकडे सर्व प्रकारचे शॉट्स आहेत. तो लेग साइडलाही जोरदार फटके मारु शकतो.
विशेष म्हणजे, तो ज्या पद्धतीने बॉलच्या लाईनमध्ये येण्यासाठी त्याच्या पावलांचा वापर करतो, ते अद्भूत आहे".
सोबतच, इरफान म्हणाला की, 'तो वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज दोन्हीविरुद्ध प्रभावीपणे खेळतो. जर तुम्ही त्याला पहिल्या बॉलपासून फटके मारण्यास सांगितले तर तो तेही करू शकतो. फिनिशरसाठी हे खूप महत्त्वाचे आहे आणि दिनेश कार्तिक ते चांगल्या पद्धतीने करू शकतो', असेही इरफान पठाण म्हणाला.
दरम्यान, दिनेश कार्तिकने आयपीएल २०२२ या मोसमात १६ सामन्यांमध्ये ३३० धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट १८३.३३ इतका तगडा होता. या कामगिरीच्या जोरावर कार्तिक वयाच्या ३७ व्या वर्षी टीम इंडियात दणक्यात पुनरागमन केले. त्याच्या पुनरागमनानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने चार डावात ४६ च्या सरासरीने आणि १५८.६२ च्या स्ट्राईक रेटने ९२ धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या