मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WTC 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी संघाची घोषणा, तडाखेबाज फलंदाज ऋषभ पंतचं पुनरागमन

WTC 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी संघाची घोषणा, तडाखेबाज फलंदाज ऋषभ पंतचं पुनरागमन

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 21, 2023 08:49 PM IST

World Test Championship : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी अंतिम ११ खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. त्यात अनेक नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आलं आहे.

World Test Championship Team
World Test Championship Team (HT)

World Test Championship Team : भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकल्यानंतर आता वर्ल्ड टेस्ट चँम्पियनशिपच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. यावर्षीच जुन महिन्यात कसोटीतील विश्वचषकाची फायनल लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळवली जाणार आहे. त्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियन संघानं आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. परंतु आता २०२१ आणि २०२३ साठी विजडनकडून वर्ल्ड टेस्ट चँम्पियनशिपच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात अंतिम ११ खेळाडूंमध्ये पाच देशांच्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

विजडनने जाहीर केलेल्या संघात ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक चार, भारताचे तीन आणि श्रीलंकेच्या दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विजडनच्या संघात भारताचा तडाखेबंद फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे. विजडनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर नव्या संघाची घोषणा केली आहे. त्यात ऋषभ पंत याच्यासह वेगवान गोलंगाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू रविंद्र जडेजा याचा समावेश आहे. तर रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली या दिग्गज फलंदाजांचा विजडनच्या संघात समावेश करण्यात आलेला नाही.

टीम इंडियातील तीन खेळाडूंशिवाय ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा, पॅट कमिन्स, मार्नस लाबुशेन आणि नॅथन लायन यांचा समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेकडून दिनेश चांदीमल आणि दिमुथ करुणारत्ने यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टो, दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा यांना संघात स्थान देण्यात आलं आहे.

विजडनच्या संघात कुणाचा समावेश?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी विजडनने जॉनी बेयरस्टो, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, पॅट कमिंस, जसप्रीत बुमराह, कगिसो रबाडा आणि नाथन लियोन, उस्मान ख्वाजा, दिमुथ करुणारत्ने, मार्नस लाबुशेन, दिनेश चांदीमल यांचा समावेश नव्या संघात केला आहे.

WhatsApp channel