मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Morocco Vs Spain: स्पेन वर्ल्डकपमधून बाहेर! मोरोक्कोनं घडवला चमत्कार

Morocco Vs Spain: स्पेन वर्ल्डकपमधून बाहेर! मोरोक्कोनं घडवला चमत्कार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 06, 2022 11:34 PM IST

Spain eliminated from fifa world cup 2022: फिफा वर्ल्डकपमध्ये मोरोक्कोने स्पेनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-० ने पराभव केला आहे. या पराभवानंतर स्पेनचा संघ फिफा वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. तर मोरक्कोचा संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे.

Morocco Vs Spain FIFA WC
Morocco Vs Spain FIFA WC

फिफा वर्ल्डकपच्या राऊंड ऑफ १६ फेरीत मोरोक्कोने चमत्कार घडवला आहे. मोरोक्कोने फिफा विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच क्वार्टर फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. मोरक्कोने राऊंड ऑफ १६ फेरीत बलाढ्य स्पेनचा धुव्वा उडवला. मोरोक्कोने २०१० चा चॅम्पियन स्पेनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-० ने पराभव केला. स्पेनचा संघ सलग दुसऱ्यांदा राऊंड ऑफ १६ फेरीत फेरीत पराभूत झाला आहे. गेल्या वर्ल्डकपमध्ये स्पेनला रशियाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागला होता.

निर्धारित ९० मिनिटांत एकही गोल न झाल्याने सामना अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त वेळ संपल्यानंतरही स्कोअर ०-० असाच राहिला. त्यानंतर सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला.

मोरोक्कोच्या विजयाचा हिरो निश्चितच गोलरक्षक यासिन बोनो हा ठरला. यासिनने शूटआऊटमध्ये स्पेनला एकही गोल करू दिला नाही आणि एकूण तीन सेव्ह केले. पेनल्टी शूटआऊटमध्ये मोरोक्कोकडून अब्देलहामिद साबिरी, हकीम झिएच आणि अश्रफ हकीमी यांनी गोल केले. फक्त बी. बेनौनला गोल करण्यात अपयश आले. 

त्याचवेळी स्पेनकडून साराबिया, कार्लोस सोलर आणि सर्जिओ बुस्केट्स यांना पेनल्टी शुटआऊटमध्ये गोल करण्यास अपयश आले. मोरोक्कोचा संघ प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. त्याचवेळी २०१० चा चॅम्पियन टीम स्पेनचा प्रवास इथेच संपला.

पेनलल्टी शुटआऊटमध्ये काय घडलं?

अब्देलहमिद साबिरी (मोरोक्को) - गोल.

पाब्लो साराबिया (स्पेन) - पेनल्टी मिस.

हकीम झिएच (मोरोक्को) - गोल

कार्लोस सोलर (स्पेन) - पेनल्टी मिस.

बी. बेनौन (मोरोक्को) - पेनल्टी मिस.

सर्जिओ बुस्केट्स (स्पेन) - पेनल्टी मिस.

अश्रफ हकिमी (मोरोक्को) - गोल.

WhatsApp channel