मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Neymar Injury: नेमारच्या दुखापतीमुळे ब्राझीलचं टेन्शन वाढलं, नेमार पुढचा सामना खेळणार?

Neymar Injury: नेमारच्या दुखापतीमुळे ब्राझीलचं टेन्शन वाढलं, नेमार पुढचा सामना खेळणार?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Nov 25, 2022 04:36 PM IST

Neymar ankle injury update: ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमार ज्युनियर दुखापतग्रस्त झाला. त्याच्या उजव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदानदेखील सोडावे लागले. आता स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यात नेमारचे खेळणे साशंक आहे.

Neymar Injury
Neymar Injury

फिफा विश्वचषक स्पर्धेत ब्राझीलने सर्बियाचा २-० असा पराभव करून आपल्या मोहिमेला धमाकेदार सुरुवात केली. ब्राझीलचे दोन्ही गोल रिचार्लिसनने केले. २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या या सामन्यातील विजयासोबतच ब्राझील संघासाठी एक चिंताजनक बातमीही समोर आली आहे. सामन्याच्या शेवटच्या मिनिटांमध्ये संघाचा स्टार खेळाडू नेमार ज्युनियर दुखापतग्रस्त झाला. त्याच्या उजव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदानदेखील सोडावे लागले. आता स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यात नेमारचे खेळणे साशंक आहे.

नेमारच्या दुखापतीबाबत ब्राझील संघाचे फिजीओ रॉड्रिगो लस्मार यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, "नेमारच्या उजव्या घोट्याला मोच आली आहे. मात्र, सोमवारी स्वित्झर्लंडविरुद्ध होणाऱ्या संघाच्या पुढील सामन्यात खेळण्यासाठी तो उपलब्ध असेल की नाही याबाबत आताच सांगता येणार नाही. 'आम्ही डगआउटमधील बेंचवर आणि नंतर फिजिओथेरपी दरम्यान त्याच्या वेदनादायक भागावर बर्फ लावला होता. दुखापतीचे गांभीर्य अद्याप समजू शकलेले नाही. तो वैद्यकिय पथकाच्या निरीक्षणाखाली राहणार आहे".

२०१४ च्या विश्वचषकातही नेमार ज्युनियर जखमी झाला होता. ब्राझीलमध्ये खेळल्या गेलेल्या त्या विश्वचषकात कोलंबियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत पाठदुखीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला होता. यानंतर उपांत्य फेरीत ब्राझीलचा जर्मनीकडून ७-१ असा पराभव झाला.

 

WhatsApp channel