मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Pakistan new jersey: जर्सी आहे की फळांचा स्टॉल, पाकिस्तानी खेळाडूनंच उडवली खिल्ली
Pakistan cricket team's new jersey
Pakistan cricket team's new jersey

Pakistan new jersey: जर्सी आहे की फळांचा स्टॉल, पाकिस्तानी खेळाडूनंच उडवली खिल्ली

22 September 2022, 19:10 ISTRohit Bibhishan Jetnavare

Pakistan cricket team's new jersey- danish kaneria: पाकिस्तानने सोमवारी आपल्या नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. या जर्सीला ‘थंडर जर्सी’ असे संबोधले जात आहे. मात्र, या जर्सीची दानिश कनेरियाने खिल्ली उडवली आहे. कनेरिया त्याच्या युट्युब चॅनेलवर बोलत होता.

पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. तथापि, पाकिस्तानच्या संघाला अद्याप पुनरागमन करण्याची संधी आहे, कारण दोन्ही देशांमध्ये ७ टी-20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मात्र, या पराभवामुळे संघाची चिंता नक्कीच वाढली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया देखील निराश झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, पाकिस्तानने सोमवारी आगामी वर्ल्डकपसाठी आपल्या नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. या जर्सीला ‘थंडर जर्सी’ असे संबोधले जात आहे. मात्र, या जर्सीची दानिश कनेरियाने खिल्ली उडवली आहे. कनेरिया त्याच्या युट्युब चॅनेलवर बोलत होता.

कनेरियाने उडवली नव्या जर्सीची खिल्ली

तो म्हणाला की, “मला पाकिस्तानच्या नव्या किटबद्दल बोलायचे आहे. पाकिस्तानची नवी जर्सी टरबूज सारखी वाटत आहे... 'फ्रूट निन्जा' नावाचा एक गेमआहे, त्या गेममध्ये तुम्ही फळ कापता. दोन फळांचे मिश्रण करून ही जर्सी बनवली आहे, असे दिसत आहे. पाकिस्तानी जर्सी गडद हिरव्या रंगाची असायला हवी. तसेच, ही जर्सी पाहून आपण फळांच्या दुकानावर उभे आहोत असे वाटते. भारतीय संघाची जर्सी देखील लाईट रंगाची आहे, ती गडद रंगाची असावी. सुस्त रंगात खेळाडूही सुस्त वाटतात", असेही कनेरिया म्हणाला.

शान मसूद इन फखर जमान आऊट

दरम्यान, आगामी ICC T20 विश्वचषकासाठी पाकिस्तानने गुरुवारी त्यांचा संघ जाहीर केला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील या संघात आशिया कप खेळणारे अनेक खेळाडू आहेत. शादाब खानला उपकर्णधार करण्यात आले आहे, तर शाहीन शाह आफ्रिदीचे संघात पुनरागमन झाले आहे. पाकिस्तानची गोलंदाजी मजबूत दिसत आहे. आफ्रिदीशिवाय संघात नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन यांचा समावेश आहे. शाहनवाज डहानी याचे नाव राखीवमध्ये ठेवण्यात आले आहे.

तसचे, आशिया चषकात खराब फॉर्मात असलेल्या फखर जमानचाही राखीवमध्ये समावेश करण्यात आला आहे. फखरच्या जागी शान मसूदचा मुख्य संघात स्थान देण्यात आले आहे.