मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Dhoni-Kohli: कर्णधारपदाच्या लालसेपोटी कोहलीने धोनीला त्रास दिला! शास्त्रींनी मिटवलं होतं प्रकरण

Dhoni-Kohli: कर्णधारपदाच्या लालसेपोटी कोहलीने धोनीला त्रास दिला! शास्त्रींनी मिटवलं होतं प्रकरण

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 12, 2023 01:31 PM IST

MS Dhoni & Virat Kohli relations : टीम इंडियाचे माजी फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी त्यांच्या 'कोचिंग बियॉन्ड' या पुस्तकात कोहली आणि एमएस धोनी यांच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

MS Dhoni & Virat Kohli
MS Dhoni & Virat Kohli

coaching beyond book: विराट कोहली चांगल्या लयीत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (IND vs SL) त्याने ११३ धावांची आक्रमक खेळी खेळली. हे त्याचे ४५ वे वनडे शतक होते. सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक ४९ वनडे शतकांच्या विक्रमापासून तो आता फक्त ४ पावले दूर आहे. श्रीलंकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आज (१२ जानेवारी) कोलकाता येथे होणार आहे.

या दरम्यान, टीम इंडियाचे माजी फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी त्यांच्या 'कोचिंग बियॉन्ड' या पुस्तकात कोहली आणि एमएस धोनी यांच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे. श्रीधर यांनी लिहिले आहे की, कसोटी कर्णधारपद मिळाल्यानंतर कोहली एकदिवसीय आणि टी-20 संघाचे नेतृत्व करण्यास खूप उत्सुक होता. त्यामुळे त्याने धोनीकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती.

आर श्रीधर यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, “२०१६ मध्ये एक अशी वेळ आली, जेव्हा विराट कोहली कसोटीशिवाय व्हाईट बॉल संघाचा कर्णधार बनण्यासाठी खूप उत्सुक होता. त्याला या फॉरमॅटचे कर्णधारपदही हवे आहे, असे त्याच्या बोलण्यातून अनेक दिसायचे. यानंतर टीम डायरेक्टर रवी शास्त्री यांनी विराटला कॉल करून समजावून सांगितले”.

रवी शास्त्रींनी काय सांगितले

रवी शास्त्री यांनी विराट कोहलीला सांगितले होते की, “तुला कसोटी संघाचे कर्णधारपद मिळाले आहे. सध्या धोनी व्हाईट बॉल क्रिकेट संघाचा कर्णधार आहे आणि तु त्याचा आदर केला पाहिजे. योग्य वेळी धोनी तुला बॉल क्रिकेट संघाचेही कर्णधारपद देईल. जर तु त्याचा आदर केला तर तु कर्णधार झाल्यावर कोणीही तुझा आदर करणार नाही. कर्णधारपदाच्या मागे धावू नको, एक दिवस तुला कर्णधारपद मिळेल”.

यानंतर कोहलीने शास्त्रींचा मुद्दा मान्य केला आणि नंतर कोहलीला बॉल क्रिकेट संघाचे कर्णधारपद मिळाले.

गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले होते. २०२१ च्या T20 विश्वचषकानंतर, त्याने T20 कर्णधारपदाचाही राजीनामा दिला, तर बोर्डाने नंतर त्याच्याकडून ODI संघाचे कर्णधारपदही काढून घेतले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या