मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ENGvsNZ: मॅचवेळी ब्रिटीश पंतप्रधानांनी ‘हे’ काय केलं! काय आहे पार्टीगेट प्रकरण
Boris Johnson
Boris Johnson (social media, England’s Barmy Army)
27 June 2022, 20:24 ISTRohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 20:24 IST
  • बार्मी आर्मीने एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा मजेदार व्हिडिओ पार्टीगेट प्रकरणावर व्यंग म्हणून तयार करण्यात आला आहे.

क्रिकेटच्या मैदानावर तसेच, प्रेक्षकांमध्ये अनेकदा विचित्र गोष्टी घडतच असतात. बऱ्याचदा चाहते आपल्या आवडत्या क्रिकेटरला भेटण्यासाठी मैदानातात घुसतात. तर कुणी हटके पोस्टर घेऊन स्टेडियममध्ये पोहोचतात. हेडिंग्ले येथूनही असाच एक मजेदार व्हिडिओ समोर आला आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना येथील मैदानावर खेळला गेला. या सामन्यादरम्यान एका क्रिकेट चाहता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटच्या कसोटीदरम्यान एक व्यक्ती ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या वेशभूषेत हेडिंग्ले स्टेडियममध्ये पोहोचला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांना त्याच्यामागे खूपच धावा धाव करावी लागली. व्हिडिओमध्येही अनेक पोलीस हे बोरिस जॉन्सनच्या वेशातील माणसाच्या मागे धावताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे, व्हिडिओमध्ये दिसणारे पोलीस देखिल खरे नाहीत. ते सर्व त्या व्यक्तीचे मित्र होते. यावेळी या सर्वांनी मिळून मैदानातील प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. बार्मी आर्मीने त्यांचा व्हिडिओ सोशल मीडिया हँडल ट्विटरवर शेअर केला आहे. हा मजेदार व्हिडिओ पार्टीगेट प्रकरणावर व्यंग म्हणून तयार करण्यात आला आहे.

काय आहे पार्टीगेट प्रकरण-

लॉकडाऊन दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नियम धाब्यावर बसवून घरी पार्टी आयोजित केली होती. यावरून बराच वाद झाला होता. याच वादावर काही लोकांनी व्यंग म्हणून असा व्हिडिओ बनवला आहे. सोशल मीडियावर देखिल लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

इंग्लंडने मालिका जिंकली-

इंग्लंडने सलग तिसरी कसोटी जिंकली आहे. पाचव्या दिवशी इंग्लंडला ११३ धावा करायच्या होत्या. त्यांच्याकडे आठ विकेट्स बाकी होत्या. अखेरच्या दिवशी ओली पोप ८२ धावांवर बाद झाला. यानंतर जो रूटने ८६ आणि जॉनी बेअरस्टोने ७१ धावांची नाबाद खेळी करत इंग्लंड संघाला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडने इंग्लंडसमोर २९६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. इंग्लंड संघाने मालिका ३-० ने जिंकली आहे.