मराठी बातम्या  /  क्रीडा  /  वाह काय शॉट आहे! एकदा बघाच; बॉलरपासून फिल्डर, प्रेक्षक सगळेच अवाक
joe root
joe root
27 June 2022, 17:26 ISTRohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 17:26 IST
  • तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पहिल्या डावात ३२९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात ३६० धावा करत ३१ धावांची आघाडी घेतली.

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडिंग्ले येथे सुरू आहे. न्यूझीलंडने इंग्लंडसमोर २९६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात मैदानात उतरला असून सामन्यावर त्यांची पकड मजबूत मानली जात आहे. आज शेवटच्या दिवशी इंग्लंडच्या लंचपर्यंत २ बाद १८३ धावा झाल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी आणखी ११३ धावांची आवश्यकता आहे. जो रुट ५५ आणि ओली पोप ८१ धावांवर खेळत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जो रूटने असा शॉट खेळला की, ज्याचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.

खरे तर जो रूट हा ऑर्थोडॉक्स शॉट्ससाठी ओळखला जातो. त्याचे कव्हर ड्राइव्ह आणि फ्लिकचे फटके अतिशय देखणे असतात. परंतु तो न्यूझीलंडविरुद्ध स्विच हिट मारताना दिसला आहे. त्याच्या बॅटमधून असा फटका निघाल्याने किवी खेळाडूंपासून ते प्रेक्षक आणि कॉमेंटेटर्सही आश्चर्यचकित झाले होते.

रूटने मारलेला स्विच हिट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनरच्या २२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने हा शॉट मारला. रूटने मारलेला स्विट हिट थर्ड मॅनच्या डोक्यावरुन थेट प्रेक्षकांमध्ये गेला. रुटने असा शॉट खेळला यावर वॅगनरचाही विश्वास बसत नव्हता. रुटकडे बघून तो काही तरी बोलला. यावर रूट फक्त हसला. स्विच हिटचा शोध इंग्लंडचाच माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने लावला होता.

दरम्यान, तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पहिल्या डावात ३२९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात ३६० धावा करत ३१ धावांची आघाडी घेतली. किवी संघाने आपल्या दुसऱ्या डावात ३२६ धावांपर्यंत मजला मारली. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी २९६ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.