मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ENG vs NZ Test : इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीनंतर दिग्गजांच्या प्रतिक्रिया, म्हणाले, टेस्ट क्रिकेट इज…

ENG vs NZ Test : इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीनंतर दिग्गजांच्या प्रतिक्रिया, म्हणाले, टेस्ट क्रिकेट इज…

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 28, 2023 12:19 PM IST

ENG vs NZ 2nd Test highlights : वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडवर एका धावेने रोमहर्षक विजय नोंदवला आहे. या सामन्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ENG vs NZ 2nd Test highlights
ENG vs NZ 2nd Test highlights

New Zealand vs England 2nd Test Wellington Test Day 5 : वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडचा अवघ्या एका धावेने पराभव केला आहे. न्यूझीलंडने आपल्या कसोटी इतिहासातील सर्वात कमी फरकाने कसोटी सामना जिंकला आहे. या सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. सामना कोणता संघ जिंकणार हे शेवटपर्यंत स्पष्ट होत नव्हते. पण शेवटी न्यूझीलंडने एका धावेने थरारक विजय मिळवला.

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील हा रोमांचक सामना पाहून वीरेंद्र सेहवाग, आर अश्विन आणि दिनेश कार्तिकसह अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कसोटी क्रिकेट हे सर्वोत्तम क्रिकेट असल्याचं सेहवाग म्हणतो. या सामन्याबाबत काही क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया.

कसोटी क्रिकेट सर्वोत्तम आहे

वेलिंग्टनमधील न्यूझीलंडच्या विजयानंतर वीरेंद्र सेहवागने ट्विट केले की, 'कसोटी क्रिकेट हे सर्वोत्तम क्रिकेट आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सध्याची सर्वात रोमांचक कसोटी. आणखी एक रोमांचक सामना. त्यानंतर न्यूझीलंडचा मोठा विजय.

टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने न्यूझीलंडच्या रोमहर्षक विजयावर एकापाठोपाठ तीन ट्विट केले आहेत. त्याने लिहिले, 'काय टेस्ट मॅच होती.'

दुसरीकडे, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने ट्विट करून लिहिले, 'खूप शानदार सामना. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांच्या चेहऱ्यावर हसू बघून बरे वाटले. बेन स्टोक्स आणि टीम साऊदी यांनी चांगले काम केले.

न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलर म्हणाला, 'कसोटी सामन्यामध्ये न्यूझीलंड काय जिंकला आहे'.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने ट्विट केले की, 'अतुलनीय खेळ. क्रिकेटचा सर्वात मोठा फॉरमॅट पुन्हा एकदा चमकला.

WhatsApp channel