मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Cricket World Record: एलिस पेरीने ६ किलोमीटर रन अप घेत टाकला चेंडू, नावावर झाला विश्वविक्रम

Cricket World Record: एलिस पेरीने ६ किलोमीटर रन अप घेत टाकला चेंडू, नावावर झाला विश्वविक्रम

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 15, 2022 11:03 AM IST

Cricket World Record: पेरीने ६ किमी अंतर ३४ मिनिटे, २२ सेकंदात पूर्ण केलं. यासह तिने आधीचा विक्रम मोडला.

एलिस पेरी
एलिस पेरी

Cricket World Record: ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर एलिस पेरी हिने स्वत:च्या नावावर विश्वविक्रम नोंदवला आहे. एलिस पेरीनं सर्वाधिक लांब असा रनअप घेत गोलंदाजी करण्याचा विश्वविक्रम केलाय. तिने फक्त अर्ध्या तासात ६ किलोमीटर धावल्यानंतर डेव्हिड वॉर्नरला चेंडू टाकला. इतकं अंतर न थांबता धावल्यानंतर चेंडू टाकल्याने एलिस पेरीच्या फिटनेसची चर्चा सध्या होत आहे.

ऑस्ट्रेलियातील एसएसजीत कायो स्पोर्ट्सच्या अधिकृत सीजन लाँचच्या कार्यक्रमात एलिस पेरी सहभागी झाली होती. यावेळी तिने सर्वाधिक लांब रन अप घेत गोलंदाजी करून विश्वविक्रमाची नोंद केली. पेरीने ६ किमी अंतर ३४ मिनिटे, २२ सेकंदात पूर्ण केलं. यासह तिने आधीचा विक्रम मोडला.

एलिस पेरीने टाकलेल्या या चेंडूवर खेळताना वॉर्नरने हूक शॉट मारला. त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स मैदानावर होता. तर एलिसा हिली ही यष्टीरक्षक होती. पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात टी२० वर्ल्ड कप होणार आहे. याआधी ऑस्ट्रेलियात अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या