मराठी बातम्या  /  क्रीडा  /  दीपिका पल्लीकल-सौरव घोषाल जोडीला कांस्य, भारतानं कमावलं ५० वं पदक

दीपिका पल्लीकल-सौरव घोषाल जोडीला कांस्य, भारतानं कमावलं ५० वं पदक

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 07, 2022 11:33 PM IST

Dipika Pallikal and Saurav Ghosal: २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत दीपिका आणि सौरवने रौप्य पदक जिंकले होते. मात्र, यावेळी ही जोडी चमत्कार करू शकली नाही आणि उपांत्य फेरीत पराभूत झाली. मात्र, भारतीय जोडीने कांस्यपदकाची लढत जिंकली आहे. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे हे ५० वे पदक आहे.

Dipika Pallikal and Saurav Ghosal
Dipika Pallikal and Saurav Ghosal

Commonwealth Games 2022: दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल यांनी स्क्वॉशच्या मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकले आहे. भारतीय जोडीने कांस्यपदकाच्या लढतीत लॉबन डोना आणि पायली कॅमेरॉन या ऑस्ट्रेलियन जोडीचा २-० असा पराभव केला. पल्लीकल आणि सौरव यांनी पहिला गेम ११-८ आणि दुसरा गेम ११-४ असा जिंकला.

२०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत दीपिका आणि सौरवने रौप्य पदक जिंकले होते. मात्र, यावेळी ही जोडी चमत्कार करू शकली नाही आणि उपांत्य फेरीत पराभूत झाली. मात्र, भारतीय जोडीने कांस्यपदकाची लढत जिंकली आहे. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे हे ५० वे पदक आहे.

भारताचे पदक विजेते -

१७ सुवर्ण : मीराबाई चानू, जेरेमी लालरिगुंना, अंचिता शेऊली, महिला लॉन बॉल्स संघ, टेबल टेनिस पुरूष संघ, सुधीर (पॅरा वेटलिफ्टिंग), साक्षी मलिक, बजरंग पुनिया, दीपक पुनिया, रवी कुमार दहिया, विनेश फोगाट, नवीन, भाविना (पैरा टेबल टेनिस), नीतू घनघास, अमित पंघाल, एल्डहॉस पॉल, निखत जरीन.

१३ रौप्य : संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशिला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंजू मलिक, प्रियांका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरूष लॉन बॉल्स संघ, अब्दुल्ला अबोबैकर, शरथ आणि साथियां

२० कांस्य : गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, लवप्रीत सिंह, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जस्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ, सौरव घोषाल, संदीप कुमार, अन्नू रानी, सौरव घोषाल-दीपिका पल्लीकल.

WhatsApp channel