मराठी बातम्या  /  Sports  /  Dinesh Kartik Instagram Post Said Thank You To All My Fellow Players Is Cricketer Dinesh Kartik Retirement Reaction

Dinesh Kartik Retirement: टीम इंडियाचा फिनीशर निवृत्त होणार? कार्तिकनं लिहिली भावनिक पोस्ट

Dinesh Kartik Retirement
Dinesh Kartik Retirement
Rohit Bibhishan Jetnavare • HT Marathi
Nov 25, 2022 10:32 AM IST

Dinesh Kartik Retirement Post: कार्तिकला विश्वचषकासाठी फिनिशर म्हणून संघात स्थान देण्यात आले होते. आता त्याने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून लवकरच निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. कार्तिकने एक भावनिक पोस्ट शेअर करताना सर्वांचे आभार मानले आहेत.

भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आता लवकरच क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. खुद्द कार्तिकने याचे संकेत दिले आहेत. ३७ वर्षांचा कार्तिक नुकताच ऑस्ट्रेलियातील T20 विश्वचषक २०२२ ही स्पर्धा खेळला होता.

ट्रेंडिंग न्यूज

कार्तिकला विश्वचषकासाठी फिनिशर म्हणून संघात स्थान देण्यात आले होते. आता त्याने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून लवकरच निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. कार्तिकने एक भावनिक पोस्ट शेअर करताना सर्वांचे आभार मानले आहेत.

दिनेश कार्तिकने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. कार्तिकने या व्हिडिओद्वारे संस्मरणीय फोटो शेअर केले आहेत. यामध्ये खेळाडू आणि कुटुंबीयांसह संघातील खेळाडू दिसत आहेत. व्हिडिओमध्ये कार्तिकची जुळी मुले आणि कुटुंबही दिसत होते.

या व्हिडिओसोबत कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'भारतीय संघासाठी टी-20 विश्वचषक खेळण्याचे ध्येय होते, ज्यासाठी मी खूप मेहनत केली. स्पर्धा खेळल्याचा अभिमान वाटतो. आम्ही वर्ल्डकप जिंकू शकलो नाही. परंतु यामुळे माझे आयुष्य अनेक अद्भुत आठवणींनी भरले आहे. माझे सर्व सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, मित्र आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे खूप खूप आभार".

कार्तिकची क्रिकेट कारकीर्द

२६ कसोटी सामने: १०२५ धावा

९४ वनडे: १७५२ धावा

६० T20 सामने: ६८६ धावा

२००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्ण

कार्तिकची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. कार्तिकने ५ सप्टेंबर २००४ रोजी टीम इंडियासाठी पदार्पण केले होते. लॉर्ड्सवर त्याने इंग्लंडविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता. तसेच, कार्तिकने यंदाच्या टी-20 विश्वचषकातील कारकिर्दीतील शेवटचा टी-२० सामना खेळला. २ नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 सामन्यात त्याने ७ धावा केल्या होत्या.

कार्तिकने २०१९ च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर कार्तिकला टीम इंडियात स्थान मिळाले नाही. त्याची कारकीर्द जवळपास संपली आहे, असे सर्वांनी गृहीत धरले होते. पण इथून कार्तिकने मेहनत घेतली आणि आयपीएलमध्ये आपला जबरदस्त खेळ दाखवला. त्यामुळे त्याची टी-20 विश्वचषकासाठी निवड झाली.

WhatsApp channel

संबंधित बातम्या