मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Dinesh karthik-Dipika Pallikal: पत्नीनं मेडल जिंकताच डीकेचं ट्वीट, म्हणाला...

Dinesh karthik-Dipika Pallikal: पत्नीनं मेडल जिंकताच डीकेचं ट्वीट, म्हणाला...

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 08, 2022 04:12 PM IST

Dinesh karthik-Dipika Pallikal: दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांनी नोव्हेंबर २०१३ मध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच ऑगस्ट २०१५ मध्ये दोघांनी लग्न केले. त्यांना दोन जुळी मुलंदेखील आहेत.

Dinesh karthik-Dipika Pallikal
Dinesh karthik-Dipika Pallikal

Commonwealth Games 2022: दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल यांनी स्क्वॉशच्या मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकले. भारतीय जोडीने कांस्यपदकाच्या लढतीत लॉबन डोना आणि पायली कॅमेरॉन या ऑस्ट्रेलियन जोडीचा २-० असा पराभव केला. पल्लीकल आणि सौरव यांनी पहिला गेम ११-८ आणि दुसरा गेम ११-४ असा जिंकला.

या विजयानंतर दीपिका पल्लीकलचा नवरा आणि टीम इंडियाचा फिनीशर दिनेश कार्तिक प्रचंड खुश झाला आहे. कार्तिकने ट्वीट करुन बायकोचे अभिनंदन केले आहे. यानंतर दिनेश कार्तिकची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. 'हे तुमच्या मेहनतीचे फळ आहे. तुमच्या दोघांच्या यशावर मी खूप खुश आहे. मला तुमचा अभिमान आहे.' अशा आशयाचे ट्वीट कार्तिकने केली आहे.

२०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत दीपिका आणि सौरवने रौप्य पदक जिंकले होते. मात्र, यावेळी ही जोडी चमत्कार करू शकली नाही आणि उपांत्य फेरीत पराभूत झाली. मात्र, भारतीय जोडीने कांस्यपदकाची लढत जिंकली आहे.

दरम्यान, यापूर्वी दीपिकाने कॉमनवेल्थ गेम्स मध्ये एक गोल्ड आणि दोन रौप्य पदके मिळवली आहेत. दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांनी नोव्हेंबर २०१३ मध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच ऑगस्ट २०१५ मध्ये दोघांनी लग्न केले. त्यांना दोन जुळी मुलंदेखील आहेत.

WhatsApp channel