नागपूर : नागपुर येथे झालेल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने मिळवलेल्या विजयानंतर दिनश कार्तिक हा चर्चेत आला आहे. सामन्याच्या शेवटच्या क्षणात दोन बॉलमध्ये तूफान फटकेबाजी करत केवळ २ बॉलमध्ये १० रन काढत कार्तिकने भारताला विजय मिळून दिला. मात्र, रोहित हा दिनेश एवजी ऋषभला बॅटिंग करण्यासाठी पाठवणार होता. याचा खुलासा खुद्द रोहित शर्माने मॅच झाल्यावर केला आहे. पावसामुळे या सामन्यात काही वेळ बाधा आली होती. यामुळे हा सामना केवळ ८ षटकांच्या खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने पहिली बॅटिंग करत ९० धावा काढल्या. भारताने ही धावसंख्या ६ विकेट गमवत चार बॉल राखीव ठेवत हा सामना जिंकला. या सोबतच या सिरिजमध्ये १-१ बरोबरी केली.
रोहित शर्मा या बाबत सामना झाल्यावर म्हणाला, मी हा विचार करत होतो की ऋषभ पंतला बॅटिंगसाठी पाठवले जाऊ शकते. पण नंतर मी हा विचार केला की शेवटचा ओवर हा सैम्स टाकणार. आणि सैम्स ऑफ कटर ही बॉलिंग करतो. दिनेश कार्तिकलाच खेळण्यासाठी पाठवले. कारण तो फीनिशर म्हणून ओळखला जातो.
८ ओवर मध्ये ऑस्ट्रेलियाने ९१ धावांचे लक्ष भारतीय संघापुढे ठेवले होते. धावांचे लक्ष गाठतांना कार्तिकला बॅटिंग करण्याची संधी मिळाली. त्याला ७ व्या ओवरच्या पाचव्या बॉलवर संधी मिळाली. यावेळी हार्दिक पांड्या बाद झाला होता. यावेळी रोहित शर्माने ७ व्या ओवरच्या शेवटच्या बॉलवर चौकार मारत सामना हा भारताच्या बाजूने वळवला होता या नंतर दिनेश कार्तिकने फीनिशिंग टच देत डेनियल सैम्सच्या शेवटच्या ओवरच्या पहिल्या बॉलवर बैकवर्ड स्केअर लेगच्या दिशेने षटकार हाणला. या नंतर दुसऱ्या बॉलवर ट्याने पुन्हा डीप मिड विकेटच्या दिशेने चौकार मारत केवळ दोन बॉलमध्ये १० धावा काढत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. दूसऱ्या बाजूने नाबाद ४६ रन काढत कॅप्टन रोहित शर्मा कार्तिकच्या बॅटिंग स्टाइलमुळे आनंदी दिसला.