मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma & Dinesh Karthik: रोहित आणि कार्तिकच्या त्या फोटोचा अर्थ काय? दिल्ली पोलिसांनी सांगितलं

Rohit Sharma & Dinesh Karthik: रोहित आणि कार्तिकच्या त्या फोटोचा अर्थ काय? दिल्ली पोलिसांनी सांगितलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 21, 2022 06:45 PM IST

delhi traffic police rohit sharma & dinesh karthik: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्यादरम्यान रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांचा एक मजेशीर फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत रोहितने कार्तिकचा गळा पकडल्याचे दिसत आहे. या व्हायरल झालेल्या फोटोचा नेमका अर्थ काय आहे, हे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.

Rohit Sharma & Dinesh Karthik
Rohit Sharma & Dinesh Karthik

टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने दिलेले २०९ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ६ गडी गमावून पूर्ण केले. ३ सामन्यांच्या T20I मालिकेत भारत आता ०-१ ने पिछाडीवर आहे.

दरम्यान या सामन्यातील रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांचा एक मजेशीर फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत रोहितने कार्तिकचा गळा पकडल्याचे दिसत आहे. या व्हायरल झालेल्या फोटोचा नेमका अर्थ काय आहे, हे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. 

रोहितनं कार्तिकचा गळा पकडला

विशेष म्हणजे, उमेश यादवच्या एकाच षटकात दोन फलंदाज विकेटकीपर दिनेश कार्तिकच्या हाती झेलबाद झाले. मात्र, या दोन्ही वेळा कार्तिकने फलंदाजाविरुद्ध स्ट्रॉंग अपील केली नाही. कार्तिक आणि अंपायर या दोघांना चेंडू बॅटला लागल्याचा आवाज आला नाही. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्माला दोन्ही वेळेस रिव्ह्यू घ्यावे लागले. दोन्ही रिव्ह्यू यशस्वी ठरल्यानंतर रोहितने मजाकमध्ये कार्तिकचा गळा पकडला आणि सामन्यात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.

दिल्ली पोलिसांच्या ट्विटमध्ये नेमके काय आहे?

दिल्ली पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर रोहित आणि कार्तिकचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, "हेल्मेटची स्ट्र्ॅप या ठिकाणी बंद केली जाते." त्याचवेळी या पोस्टमधील कॅप्शनमध्ये कार्तिकच्या नावासोबतही वर्ड प्ले करण्यात आला आहे. "हेल्मेट स्ट्रॅप क्लोज Karo-Thik से।" असे वर्ड प्ले करत लिहिले आहे. दिनेश कार्तिकचे नाव इंग्रजीमध्ये Karthik असे लिहिले जाते.

भारतीय गोलंदाजांची लाजिरवाणी कामगिरी

पहिल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २०८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य ६ गडी गमावून१ १९.२ षटकांत पूर्ण केले.

२०९ धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी लाजिरवाणी कामगिरी केली. टीम इंडियाचा स्ट्राईक बॉलर भुवनेश्वर कुमारने ४ ओव्हरमध्ये ५२ रन्स दिल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. युझवेंद्र चहलच्या बाबतीतही तसेच झाले, चहलने केवळ ३.२ षटकात ४२ धावा दिल्या. तर प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या हर्षल पटेलने ४ षटकात ४९ धावा दिल्या.

WhatsApp channel