पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. भारताने पॅरालिम्पिक २०२४ च्या सातव्या (४ सप्टेंबर) दिवसापर्यंत २१ पदकं जिंकली आहेत.
भारताने आतापर्यंत ५ खेळांमध्ये पदके जिंकली आहेत. त्यापैकी सर्वाधिक ११ पदके ॲथलेटिक्समधून आली आहेत. त्याचबरोबर बॅडमिंटनमध्ये ५ तर नेमबाजीत ४ पदके आली आहेत. तिरंदाजीतून १ पदक मिळाले आहे.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये खेळाडूंच्या अनेक प्रेरणादायी संघर्ष कथा ऐकायला मिळत आहेत. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ ने जगाला दाखवून दिले आहे की प्रबळ इच्छाशक्ती असेल तर काहीही साध्य करता येते. आव्हाने असतानाही खेळाडूंनी यशाची शिखरे गाठली आहेत. भारताच्या दीप्ती जीवनजी अशा प्रेरणादायी खेळाडूंपैकी एक आहेत जिचा प्रवास खडतर आव्हानांनी भरलेला होता, परंतु तिने कधीही हार मानली नाही.
दीप्ती जीवनजीने महिलांच्या ४०० मीटर टी-20 इव्हेंटमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. पॅरा-ॲथलीटने ही शर्यत ५५.८२ सेकंदात पूर्ण केली.
दीप्ती जीवनजी हिचा जन्म सूर्यग्रहणादरम्यान झाला. जन्माच्या वेळी तिचे डोकं खूपच लहान होते, तसेच ओठ आणि नाक इतरांपेक्षा किंचित असामान्य होते. यामुळे गावातील लोक तिला चिडवायचे. पिछी (मेंटल) कोठी (माकड) म्हणून त्रास द्यायचे. यानंतर घरी येताच ती ढसाढसा रडायची. ती लहान होती. तिला कसंतरी समजावून आम्ही शांत करायचो, लोक आम्हाल तिला अनाथाश्रमात पाठवायला सांगायचे, पण मूल हे मूल असते.
पण आता तिला दुरच्या देशात जाऊन देशासाठी पदक जिंकताना पाहून खूप आनंद आणि समाधान वाटत आहे. तसेच, ती एक खास मुलगी असल्याचे सिद्ध झाले आहे. हे शब्द आहेत, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या दीप्ती जीवनजी हिच्या आईचे.
लोक आम्हाला त्याला . आज तिला दूरच्या देशात पॅरालिम्पिक पदक जिंकताना पाहून ती खरोखरच एक खास मुलगी आहे हे सिद्ध होते... होय, ही कथा आहे दीप्ती जीवनजीची आणि दीप्तीची आई जीवनजी यांनी या गोष्टी सांगितल्या.
दीप्ती जीवनजीने यापूर्वी जपानमधील कोबे येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स पॅरा चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले होते. ती आंध्र प्रदेशातील वारंगल जिल्ह्यातील कलेडा गावची रहिवासी आहे.
तिचे आई-वडील जीवनजी यादगिरी आणि जीवनजी धनलक्ष्मी यांनी त्यांच्या मुलीला गावातील लोकांचे टोमणे कसे सहन करावे लागले, ते सांगितले आहे. दिप्तीचा जन्म बौद्धिक अपंगत्वाने ((Intellectual Disability) झाला होता.