मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

May 20, 2024 10:06 PM IST

Deepthi Jeevanji Gold Medal in Para Championship : दीप्ती जीवनजीच्या आई-वडिलांना 'मानसिकदृष्ट्या कमकुवत' मूल झाल्याबद्दल गावातील लोक खूप टोमणे मारायचे, पण जपानमधील कोबे येथे सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता तेच लोक त्यांचे कौतुक करताना थकत नाहीत.

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक
Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

Deepthi Jeevanji Gold Medal Para Championship : भारताच्या दीप्ती जीवनजीने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Para Athletic Championship) महिलांच्या ४०० मीटर टी-20 शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे. दीप्तीने ५५.०७ सेकंदाच्या विश्वविक्रमी वेळेसह सुवर्णपदकाची कमाई केली. 

ट्रेंडिंग न्यूज

दीप्तीने अमेरिकेच्या ब्रायना क्लार्कचा ५५.१२ सेकंदांचा विश्वविक्रम मोडला जो तिने गेल्या वर्षी पॅरिसमध्ये प्रस्थापित केला होता.

तुर्कीच्या एसील ओंडरने ५५.१९ सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले, तर इक्वेडोरच्या लिजनशेला एंगुलोने ५६.६८ सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले.

टी-20 श्रेणीतील शर्यती बौद्धिकदृष्ट्या कमजोर खेळाडूंसाठी आहेत. योगेश कथुनियाने पुरुषांच्या F56 डिस्कस थ्रोमध्ये ४१.८० मीटरसह रौप्य पदक जिंकले. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत १ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्यपदके जिंकली आहेत.

टोमणे मारणाऱ्यांना सणसणीत चपराक

दीप्ती जीवनजीच्या आई-वडिलांना 'मानसिकदृष्ट्या कमकुवत' मूल झाल्याबद्दल गावातील लोक खूप टोमणे मारायचे, पण जपानमधील कोबे येथे सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता तेच लोक त्यांचे कौतुक करताना थकत नाहीत.

दीप्तीच्या या पराक्रमानंतर तिच्या घराबाहेर मोठ्या संख्येने लोक जमले होते. दीप्तीच्या विजयानंतर तेलंगणातील तिच्या कालेडा या गावात लोकांनी जल्लोष केला.

तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात मजुर कुटुंबामध्ये जन्मलेली २० वर्षीय दीप्ती आगामी पॅरिस पॅरालिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. T20 श्रेणी बौद्धिकदृष्ट्या कमजोर असलेल्या खेळाडूंसाठी आहे.

प्रशिक्षकांना प्रचंड आनंद

दीप्तीचे प्रशिक्षक नागपुरी रमेश यांनी सांगितले की, तिच्या पालकांना गावकऱ्यांकडून टोमणे सहन करावे लागे. रमेश म्हणाले, 'दीप्तीचे आई-वडील रोजंदारी मजूर होते आणि कुटुंब चालवण्यासाठी त्यांची दररोज धडपड सुरू असते. याशिवाय मानसिकदृष्ट्या कमकुवत मुलीचे लग्न होऊ शकत नाही, असे गावकऱ्यांकडून त्यांना सतत टोमणेही ऐकावे लागायचे.

तथापि, दीप्तीने गेल्या वर्षी हँगझो आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर परिस्थिती बदलू लागली. आता तेच गावकरी दीप्तीच्या या कामगिरीबद्दल तिच्या पालकांचे कौतुक करताना दिसत आहेत.

WhatsApp channel