मराठी बातम्या  /  क्रीडा  /  DC vs MI WPL 2023 Final : आज फायनलचा थरार, अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११, कुणाचं पारडं जड? पाहा

DC vs MI WPL 2023 Final : आज फायनलचा थरार, अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११, कुणाचं पारडं जड? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 26, 2023 10:53 AM IST

Delhi Capitals vs Mumbai Indians WPL final : महिला प्रीमियर लीगचा (WPL 2023) पहिला अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (MI VS DC) यांच्यात होणार आहे. हा सामना आज रविवारी (२६ मार्च) मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर विजेतेपदाचा सामना होणार आहे.

DC vs MI WPL 2023 Final
DC vs MI WPL 2023 Final

dc vs mi WPL 2023 Final : महिला प्रीमियर लीगचा (WPL 2023) थरार अंतिम टप्प्यात आला आहे. स्पर्धेच्या पहिल्या सीझनचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (MI VS DC WPL FINAL) यांच्यात आज (२६ मार्च) रविवारी होणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. गट फेरीत दोन्ही संघांनी ६-६ सामने जिंकले होते आणि एकमेकांना एकदा पराभूत केले होते.

दोन्ही संघांची कामगिरी

स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये सर्व संघ एकमेकांविरुद्ध २-२ सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत हरनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स देखील दोनदा आमनेसामने आले आहेत. यातील पहिला सामना मुंबईने ८ विकेट्सनी जिंकला तर दुसरा सामना दिल्लीने ९ विकेट्सनी जिंकला. अशा परिस्थितीत दोन्हीपैकी कोणत्या एका संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानता येणार नाही. यामुळे सामना रोमहर्षक होईल अशी आशा आहे.

साखळी सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी

या स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये दोन्ही संघांकडून उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली. मुंबईने महिला प्रीमियर लीगची सुरुवात सलग ५ विजयांसह केली. त्याचवेळी दिल्लीने पहिले दोन सामने जिंकले होते. दोन्ही संघांना ८ लीग सामन्यांपैकी ६-६ सामने जिंकण्यात यश आले. चांगल्या नेट रनरेटमुळे दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आणि संघाने थेट अंतिम फेरीत प्रवेश केला, तर मुंबईला यूपी वॉरियर्सविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळावा लागला.

फायनलमधील दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही संघ फारसे बदल करणार नाहीत. 

दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन- मेग लॅनिंग (कर्णधार), शेफाली वर्मा, अॅलिस कॅप्स, जेमिमा रॉड्रिग्ज, मारिजाने कॅप, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, पूनम यादव.

मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन - हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, सायका इशाक.

WhatsApp channel