मराठी बातम्या  /  Sports  /  David Warner Announces Retirement From Test Cricket Warner Will Play Last Test Match Vs Pakistan Series In January 2024

David Warner Retire : डेव्हिड वॉर्नरची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, ‘हा’ असेल शेवटचा सामना, पाहा

David Warner Retirement
David Warner Retirement
Rohit Bibhishan Jetnavare • HT Marathi
Jun 03, 2023 03:39 PM IST

David Warner Retirement : डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शेवटचा सामना कधी खेळणार हे त्याने सांगितले आहे.

David Warner Retirement in Test cricket : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आयसीसीने अधिकृत वेबसाइटवर ही माहिती शेअर केली आहे. तो जानेवारी २०२४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

याआधी वॉर्नर अॅशेस मालिका आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात जानेवारी २०२४ मध्ये कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. याच मालिकेत डेव्हिड वॉर्नर त्याचा शेवटचा सामना खेळणार आहे.

वॉर्नर सध्या इंग्लंडमध्ये असून तो भारताविरुद्धच्या WTC final ची तयारी करत आहे. त्यानंतर वॉर्नर १६ जूनपासून इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेचा भाग असेल. आयसीसीच्या वेबसाईटनुसार, वॉर्नर जानेवारी २०२४ मधील पाकिस्तानविरुद्धच्या सिडनी कसोटीनंतर निवृत्त होणार आहे. हे त्याचे घरचे मैदान आहे. याआधी ते वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळू शकतो.

वॉर्नर म्हणाला की, तुम्हाला धावा कराव्या लागतील. मी नेहमी म्हणत आलो की (२०२४) टी-20 विश्वचषकात माझ्या करिअरचा शेवट होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि ऍशेस मालिकेनंतर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत मी शेवटच्या वेळी खेळणार आहे.

विशेष म्हणजे वॉर्नरचे आतापर्यंतचे टेस्ट करिअर उत्कृष्ट राहिले आहे. त्याने १०२ कसोटी सामन्यांमध्ये ८१५८ धावा केल्या आहेत. यादरम्यान वॉर्नरने ३ द्विशतकं, २५ शतकं आणि ३४ अर्धशतकं झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या ३३५ धावा आहे. त्याने भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानसह अनेक मोठ्या संघांविरुद्ध चमकदार कामगिरी केली आहे.

WhatsApp channel