चिमुकलीच्या निधनाने डेव्हिड मिलरवर दु:खाचा डोंगर, कोण आहे ती?
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  चिमुकलीच्या निधनाने डेव्हिड मिलरवर दु:खाचा डोंगर, कोण आहे ती?

चिमुकलीच्या निधनाने डेव्हिड मिलरवर दु:खाचा डोंगर, कोण आहे ती?

Published Oct 09, 2022 09:33 AM IST

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर डेव्हिड मिलर याने सोशल मीडियावर एका चिमुकलीच्या निधनाची पोस्ट शेअर केली आहे. अनेकांनी ती त्याची मुलगी असल्याचं म्हटलंय पण ती डेव्हिड मिलरची मुलगी नाही.

<p>चिमुकलीच्या निधनाने डेव्हिड मिलरवर दु:खाचा डोंगर, कोण आहे ती?</p>
<p>चिमुकलीच्या निधनाने डेव्हिड मिलरवर दु:खाचा डोंगर, कोण आहे ती?</p>

दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून त्यांचा स्टार क्रिकेटपटू डेव्हिड मिलर याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डेव्हिड मिलरने त्याच्या सोशल मीडियावर चिमुकलीसोबतच्या फोटोंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देताना RIP You Little Rockstar, Love You Always असं म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टनंतर डेव्हिड मिलरच्या मुलीचं निधन अशा बातम्याही माध्यमांनी दिल्या आहेत. मात्र ती मुलगी डेव्हिड मिलरची नसून त्याच्या जवळच्या मित्राची असल्याचं वृत्त क्रिकट्रॅकरने दिलं आहे.

डेव्हिड मिलरने केलेल्या पोस्टनंतर चाहत्यांनी ती त्याची मुलगी असल्याचा समज करून घेतला आहे. त्यानंतर काहींनी मिलर दक्षिण आफ्रिकेला परतणार असल्याचंही म्हटलं. मात्र अद्याप मिलर भारताविरुद्धच्या उर्वरीत मालिकेत खेळणार की नाही हे स्पष्ट नाही. पण ती डेव्हिड मिलरची मुलगी नाही तर त्याची खास चाहती आहे. ती कर्करोगाशी झुंज देत होती. तसंच मिलरची मोठी चाहती होती. मिलरने शेअर केलेल्या व्हिडीओत तिच्यासोबत असलेलं नातं दिसून येतं. मिलरने तिचं नावही पोस्टमध्ये सांगितलेलं नाहीय.

मिलरने लिहिलं की, तुझी खूप आठवण येईल. मनाने तू खोपी मोठी होतीस, आयुष्यात संघर्ष करत असतानाही त्याकडे सकारात्मकतेने पाहिलेस. नेहमीच तुझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य असायचे. या प्रवासात तुला भेटलेल्या प्रत्येकासाठी तू प्रेरणा होतीस. प्रत्येक क्षण कसा जगायचा हे तुझ्याकडून मला शिकायला मिळालं.

भारत दौऱ्यात डेव्हिड मिलर सध्या फॉर्ममध्ये आहे. टी२० मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेतही त्याची चांगली कामगिरी आहे. भारताविरुद्ध तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने नाबाद शतकी खेळी केली होती. तर पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ७५ धावा केल्या होत्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या