Chess Olympiad : डी गुकेशनं इतिहास रचला, भारतानं पहिल्यांदाच चेस ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकलं-d gukesh won the gold medal in chess olympiad 2024 d gukesh created history by winning gold medal in chess olympiad ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Chess Olympiad : डी गुकेशनं इतिहास रचला, भारतानं पहिल्यांदाच चेस ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकलं

Chess Olympiad : डी गुकेशनं इतिहास रचला, भारतानं पहिल्यांदाच चेस ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकलं

Sep 22, 2024 07:21 PM IST

D gukesh won gold medal in chess olympiad 2024 : बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ मध्ये भारतीय खेळाडू डी गुकेशकडून खूप अपेक्षा होत्या. त्याने अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

Chess Olympiad : डी गुकेशनं इतिहास रचला, भारतानं पहिल्यांदाच चेस ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकलं
Chess Olympiad : डी गुकेशनं इतिहास रचला, भारतानं पहिल्यांदाच चेस ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकलं (AP)

भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश याने बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात त्याने शानदार खेळ केला आणि भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. डी गुकेशने आता ४५ व्या ऑलिम्पियाडमध्ये संपूर्ण जगात भारताचे नाव उंचावले आहे.

बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या १०व्या फेरीत भारतीय खेळाडूंनी अमेरिकेचा २.५-१.५ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. डी'गुकेशने फॅबियानो कारुआना याचा पराभव केला.

बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ च्या खुल्या विभागात भारताने प्रथमच सुवर्णपदक जिंकले. हंगेरीतील बुडापेस्ट येथे रविवारी (२२ सप्टेंबर) भारताने ही शानदार कामगिरी केली. अंतिम फेरीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनचा सामना अमेरिकेशी झाला, जिथे चीनला दोन बोर्डवर पराभवाचा सामना करावा लागला.

तर दुसरीकडे अर्जुन एरिगेसी आणि डी गुकेश यांनी स्लोव्हेनियाविरुद्ध भारताला विजय मिळवून दिला. या विजयाने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. सलग ८ विजयांसह प्रारंभी भारताची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. यानंतर गतविजेत्या उझबेकिस्तानने भारताला बरोबरीत रोखले. पुढच्याच फेरीत भारताने पुनरागमन करत अव्वल मानांकित अमेरिकेचा पराभव करत विजेतेपदावर आपली पकड मजबूत केली.

या विजयासह, भारताने २०२२ ऑलिम्पियाडमध्ये आपली कामगिरी आणखी सुधारली, जिथे त्याने घरच्या भूमीवर कांस्यपदक जिंकले होते. यापूर्वी २०१४ च्या च्या स्पर्धेत भारताने कांस्यपदक जिंकले होते.

डी गुकेशने इतिहास रचल्यानंतर ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे आणि प्रज्ञानंदचे प्रशिक्षक आरबी रमेश यांनीही त्याचे अभिनंदन केले आहे.

या ऐतिहासिक कामगिरीनंतर प्रवीण ठिपसे यांनी सांगितले की, भारत ११व्या फेरीत पराभूत झाला असता तरी त्यांचे इतर संघाशी बरोबरीचे गुण झाले असते. अशा स्थितीत ट्रायब्रेकरमध्ये भारताची गुणसंख्या चांगली होती. त्यामुळे त्यांचे सुवर्णपदक निश्चित होते. 

Whats_app_banner
विभाग