D Gukesh : डी गुकेशला टॅक्समधून सूट, आता बक्षिसाची एकूण किती रक्कम मिळणार? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  D Gukesh : डी गुकेशला टॅक्समधून सूट, आता बक्षिसाची एकूण किती रक्कम मिळणार? जाणून घ्या

D Gukesh : डी गुकेशला टॅक्समधून सूट, आता बक्षिसाची एकूण किती रक्कम मिळणार? जाणून घ्या

Dec 20, 2024 04:45 PM IST

D Gukesh Income Tax News : भारताचा बुद्धिबळ खेळाडू डी. गुकेशसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याला बक्षिसाच्या रकमेतील करातून सूट मिळणार आहे.

D Gukesh : डी गुकेशला टॅक्समधून सूट, आता बक्षिसाची एकूण किती रक्कम मिळणार? जाणून घ्या
D Gukesh : डी गुकेशला टॅक्समधून सूट, आता बक्षिसाची एकूण किती रक्कम मिळणार? जाणून घ्या (PTI)

भारताचा युवा बुद्धिबळपटू डी गुकेश याने १२ डिसेंबर २०२४ रोजी सिंगापूर येथे जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून इतिहास रचला. त्याने चीनच्या डिंग लिरेन याला पराभूत करून सर्वात तरुण बुद्धिबळ जगज्जेता बनण्याचा विक्रम केला. या शानदार विजयानंतर गुकेशला ११.४५ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.

याव्यतिरिक्त, तामिळनाडू सरकारने त्याला आणखी ५ कोटी रुपयांचे बक्षीस दिले. यानंत बक्षिसाची एकूण रक्कम १६.४५ कोटी रुपये झाली.

गुकेशला आता कर भरावा लागणार नाही

भारतीय कर नियमांनुसार, गुकेशच्या बक्षीस रकमेवर ४२.५ टक्के कर आकारला गेला असता, ज्यामुळे त्याला अंदाजे ६.२३ कोटी रुपये कर भरावे लागले असते. यानंतर त्याच्याकडे फक्त १०.२२ कोटी रुपये शिल्लक राहिले असते.

मात्र, आता मोदी सरकारच्या अर्थ मंत्रालयाने गुकेशच्या या कामगिरीचे कौतुक केले असून त्याच्या बक्षीसावर करमाफी जाहीर केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, लवकरच हा निर्णय अधिकृतपणे जारी केला जाईल, ज्यामुळे गुकेशला बक्षिसाची संपूर्ण रक्कम मिळेल.

करानंतर किती पैसे लागतात?

गुकेशला १३ लाख डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळाली होती, जी भारतीय चलनात ११.४५ कोटी रुपये आहे. भारतीय कर नियमांनुसार, ही रक्कम ३० टक्के कर, १५ टक्के अधिभार आणि ४ टक्के उपकराच्या अधीन आहे.

एकूणच, गुकेशला ४.९ कोटी रुपये कर भरावा लागला असता, ज्यामुळे त्याच्याकडे ७.३६ कोटी रुपये शिल्लक राहिले असते. याशिवाय तामिळनाडू सरकारने दिलेल्या ५ कोटी रुपयांवरही कर लावला होता, त्यामुळे गुकेशला २.८६ कोटी रुपयांचा कर भरावा लागला असता. पण आता त्याला कसलाच कर भरावा लागणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले

गुकेशच्या विजेतेपदानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले होते. या विजयासह, विश्वनाथन आनंद याच्यानंतर विश्व चॅम्पियनशिप जिंकणारा गुकेश हा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला. या विशेष विजयानंतर गुकेशने वडील आणि प्रशिक्षक यांना मिठी मारून आनंद व्यक्त केला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग