मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CWG Cricket: भारतीय किक्रेट चाहत्यांसाठी गुड न्यूज! CWG आयोजकांचा मोठा निर्णय
CWG Cricket
CWG Cricket
05 August 2022, 16:38 ISTRohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
05 August 2022, 16:38 IST
  • CWG 2022 India W vs England W Semi Final: भारतीय महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत यजमान इंग्लंडच्या महिला संघाशी भिडणार आहे. इंग्लंड ब गटात अव्वल आहे, तर भारत अ गटात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सामना बर्मिंगहॅमच्या ऐतिहासिक एजबॅस्टन मैदानावर होणार आहे.

Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे. सेमी फायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. तर, दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हे दोन्ही सामना शनिवारी (६ ऑगस्ट) रोजी खेळवण्यात येणार आहेत. मात्र, त्यापूर्वी एक मोठी माहिती समोर येत आहे. क्रिकेटच्या दोन्ही सेमी फायनलच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता होणार होता. मात्र आता त्याची वेळ बदलली आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता खेळवण्यात येणार आहे.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अंतिम चारमध्ये पोहोचल्यामुळे, आयोजकांनी भारतीय प्रेक्षकांसाठी सामन्याच्या वेळेत बदल केली आहे.

यासोबतच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमीफायनलची वेळही बदलली आहे. हा सामना आधी दुपारी ३:३० वाजता खेळवण्यात येणार होता. मात्र आता तो सायंकाळी ६ वाजता खेळवण्यात येणार आहे.

सेमी फायनल आणि फायनलचे वेळापत्रक

६ ऑगस्ट

पहिली  सेमी फायनल - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड - (सायंकाळी ६ वाजता) 

दुसरी सेमी फायनल - भारत विरुद्ध इंग्लंड  - (दुपारी ३:३० वाजता)

 ७ ऑगस्ट 

कांस्य पदकाचा सामना - (दुपारी २:३० वाजता)

सुवर्ण पदकाचा सामना (फायनल) - (रात्री ९:३० वाजता)