मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CWG 2022 Wrestling: कुस्तीपटू अंशू मलिकला रौप्य, फायनलमध्ये पराभव

CWG 2022 Wrestling: कुस्तीपटू अंशू मलिकला रौप्य, फायनलमध्ये पराभव

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 05, 2022 09:58 PM IST

Anshu Malik: भारतीय कुस्तीपटू अंशू मलिकला फ्रीस्टाइल ५७ किलो गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंशूला पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळाले आहे. तिची ही पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा आहे.

anshu malik
anshu malik

Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये आठव्या दिवशी भारताच्या चार कुस्तीपटूंनी फायनल गाठली आहे. अंतिम फेरीत पोहोचलेल्या कुस्तीपटूंमध्ये बजरंग पुनिया, दीपक पुनिया, साक्षी मलिक आणि अंशू मलिक यांच्या नावांचा समावेश आहे. एवढेच नाही तर मोहित ग्रेवाल आणि दिव्या काकरन यांनी कांस्यपदकाच्या लढतीत स्थान निश्चित केले आहे.

भारतीय कुस्तीपटू अंशू मलिकला फ्रीस्टाइल ५७ किलो गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंशूचा अंतिम फेरीत नायजेरियाच्या ओडानायो फोलासाडोने ३-७ असा पराभव केला. ओडानायोने सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले आहे. त्याचबरोबर अंशूला पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळाले आहे. तिचीही पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा आहे.

अंशूने शेवटच्या सेकंदात काही गुण मिळवून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण ते गुण पुरेसे नव्हते. आता अंशूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. दुसरीकडे, ओदुनायोचे हे सलग तिसरे सुवर्णपदक ठरले.

भारताचे पदक विजेते

६ सुवर्ण: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॅरा-पॉवरलिफ्टिंग)

८ रौप्य: संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक

७ कांस्य: गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर

WhatsApp channel

विभाग