मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CWG 2022 Wrestling: कुस्तीत पडणार पदकांचा पाऊस! भारताचे चार पैलवान फायनलमध्ये
CWG 2022 Wrestling
CWG 2022 Wrestling
05 August 2022, 20:28 ISTRohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
05 August 2022, 20:28 IST
  • CWG 2022 Wrestling: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने आतापर्यंत २० पदके जिंकली आहेत. यामध्ये सहा सुवर्ण, सात रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश आहे.

Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने आतापर्यंत २० पदके जिंकली आहेत. यामध्ये सहा सुवर्ण, सात रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश आहे. याशिवाय सात भारतीय बॉक्सर्सनीही आपली पदकं निश्चित केली आहेत. अशा प्रकारे भारताला किमान २७ पदके मिळण्याची खात्री आहे. आठव्या दिवशी भावीनाने पॅरा टेबल टेनिसच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला असून पदक निश्चित झाले आहे. पुरुष रिले शर्यतीचा संघही अंतिम फेरीत पोहोचला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

याशिवाय आजपासून सुरु झालेल्या कुस्तीमध्ये भारतीय कुस्तीपटूंनी शानदार सुरुवात केली आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत आज सहा भारतीय कुस्तीपटू मॅटवर उतरले असून सर्वांना पदक जिंकण्याची संधी आहे. आज रात्री साडेनऊ वाजता पदकांचे सामने सुरू होतील.

दीपक पुनिया-

दीपक पुनियाने सेमी फायनलमध्ये विजय मिळवला आहे. त्याने कुस्तीत भारताचे चौथे पदक निश्चित केले आहे. त्याने ८६ किलो वजनी गटात कॅनडाच्या अलेक्झांडर मूरचा ३-१ असा पराभव केला. दुसरीकडे भारताच्या मोहित ग्रेवालला कॅनडाच्या अमरवीर ढेसीकडून पराभव पत्करावा लागला. ग्रेवाल हा सामना२-१२ असा हरला.

अंशू मलिक

भारताची २० वर्षीय कुस्तीपटू अंशू मलिक फायनलमध्ये पोहोचली आहे. तिने महिलांच्या ५७ किलो गटात श्रीलंकेच्या नेथमी पोरुथोटेजचा १०-० असा पराभव केला. अंशूने हा सामना ६२ सेकंदात जिंकला. अंशूने राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच पदक निश्चित केले आहे.

बजरंग पुनिया- 

बजरंग पुनियाने इंग्लंडच्या जॉर्ज रामचा पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्याने ६५ किलो गटात रामचा १०-० असा पराभव केला.

साक्षी मलिक

साक्षी मलिकनेही महिलांच्या फ्रीस्टाइलमध्ये ६२ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी तांत्रिक श्रेष्ठतेच्या जोरावर कॅमेरूनच्या एटेन एनगोलेचा १०-० असा पराभव केला.

भारतीय कुस्तीपटूंचे पुढील वेळापत्रक

अंशू मलिक विरुद्ध ओदुनायो अडेकुरोये (नायजेरिया) महिलांच्या ५७ किलो गटात सुवर्णपदकासाठी.

बजरंग पुनिया विरुद्ध लचलान मॅकनील (कॅनडा)- पुरुषांच्या ६५ किलोमध्ये सुवर्ण पदकासाठी.

साक्षी मलिक विरुद्ध अॅना गोडिनेझ गोन्झालेझ (कॅनडा) महिलांच्या ६२ किलोमध्ये सुवर्ण पदकासाठी

दीपक पुनिया विरुद्ध मुहम्मद इनाम (पाकिस्तान)- पुरुषांच्या ८६ किलोमध्ये सुवर्ण पदकासठी

दिव्या काकरन विरुद्ध टायगर लिली कॉकर लेमालियर (टोंगा)- महिलांच्या ६८ किलोमध्ये कांस्यपदकासाठी

मोहित ग्रेवाल विरुद्ध आरोन जॉन्सन (जमैका)- पुरुषांच्या १२५ किलो गटात कांस्यपदकासाठी

 

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग