मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CWG 2022 Wrestling: कुस्तीत पदकांचा पाऊस! बजरंग, साक्षीनंतर दीपकनंही जिंकलं सोनं

CWG 2022 Wrestling: कुस्तीत पदकांचा पाऊस! बजरंग, साक्षीनंतर दीपकनंही जिंकलं सोनं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 05, 2022 11:37 PM IST

Deepak Punia: दीपक पुनियाने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सर्वात संस्मरणीय सुवर्णपदक जिंकून दिले आहे. त्याने फ्रीस्टाइल ८६ किलो गटात पाकिस्तानच्या मोहम्मद इनामचा पराभव केला.

CWG 2022 Wrestling
CWG 2022 Wrestling

Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये आठव्या दिवशी भारताच्या चार कुस्तीपटूंनी फायनल गाठली आहे. अंतिम फेरीत बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि दीपक पुनिया यांनी सुवर्ण पदक मिळवले आहे. तर अंशू मलिकला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

सोबतच मोहित ग्रेवाल आणि दिव्या काकरन यांनी कांस्यपदकाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले आहे.

दीपक पुनियाने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सर्वात संस्मरणीय सुवर्णपदक जिंकून दिले आहे. त्याने फ्रीस्टाइल ८६ किलो गटात पाकिस्तानच्या मोहम्मद इनामचा पराभव केला. दीपकने पाकिस्तानी कुस्तीपटूला एकही संधी दिली नाही. दीपकने हा सामना ३-० ने जिंकला. राष्ट्रकुल स्पर्धेतील दीपक पुनियाचे हे पहिले पदक आहे. कुस्तीत भारताला तिसरे सुवर्ण मिळाले आहे.

साक्षी मलिकला सुवर्ण पदक-

<p>sakshi malik</p>
sakshi malik

साक्षी मलिकनेही सुवर्णपदक पटकावले आहे. साक्षी मलिकने महिलांच्या ६२ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कॅनडाच्या अना गोडिनेझ गोन्झालेझचा (pin fall) ४-४ असा पराभव केला. साक्षीने यापूर्वी कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य (२०१४) आणि कांस्यपदक (२०१८) जिंकले होते.

बजरंग पुनिया सुवर्ण पदक-

<p>Bajrang Punia</p>
Bajrang Punia

बजरंग पुनियानेही भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. पुरुषांच्या फ्रीस्टाइल ६५ किलोमध्ये बजरंग पुनियाने कॅनडाच्या एल. मॅक्लीनचा ९-२ असा पराभव केला.

बजरंगने यापूर्वी २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. त्याचवेळी २०१४ मध्ये त्याने रौप्य पदक जिंकले होते.

अंशू मलिकला रौप्य पदक-

<p>anshu malik</p>
anshu malik

भारतीय कुस्तीपटू अंशू मलिकला फ्रीस्टाइल ५७ किलो गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंशूचा अंतिम फेरीत नायजेरियाच्या ओडानायो फोलासाडोने ३-७ असा पराभव केला. ओडानायोने सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले आहे. त्याचबरोबर अंशूला पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळाले आहे. तिचीही पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा आहे.

भारताचे पदक विजेते

९ सुवर्ण: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया

८ रौप्य: संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक

८ कांस्य: गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन

WhatsApp channel