मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Bajrang Punia Wrestling: बजरंगानं पुन्हा केली कमाल, कुस्तीत भारताला पहिलं सुवर्ण

Bajrang Punia Wrestling: बजरंगानं पुन्हा केली कमाल, कुस्तीत भारताला पहिलं सुवर्ण

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 05, 2022 10:20 PM IST

Bajrang Punia: बजरंग पुनियाने (Bajrang Punia) भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. पुरुषांच्या फ्रीस्टाइल ६५ किलोमध्ये बजरंग पुनियाने कॅनडाच्या एल. मॅक्लीनचा ९-२ असा पराभव केला.

bajrang punia
bajrang punia

Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये आठव्या दिवशी भारताच्या चार कुस्तीपटूंनी फायनल गाठली आहे. अंतिम फेरीत पोहोचलेल्या कुस्तीपटूंमध्ये बजरंग पुनिया, दीपक पुनिया, साक्षी मलिक आणि अंशू मलिक यांच्या नावांचा समावेश आहे. एवढेच नाही तर मोहित ग्रेवाल आणि दिव्या काकरन यांनी कांस्यपदकाच्या लढतीत स्थान निश्चित केले आहे.

बजरंग पुनियाने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. पुरुषांच्या फ्रीस्टाइल ६५ किलोमध्ये बजरंग पुनियाने कॅनडाच्या एल. मॅक्लीनचा ९-२ असा पराभव केला.

बजरंगने पहिल्या हाफमध्ये ४ गुण मिळवले. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये मॅक्लीनने दोन गुणांसह पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र बजरंगने शानदार खेळाचे प्रदर्शन केले.

बर्मिंगहॅममधील कुस्तीतील भारताचे हे पहिले आणि एकूण सातवे सुवर्णपदक आहे. बजरंगने यापूर्वी २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. त्याचवेळी २०१४ मध्ये त्याने रौप्य पदक जिंकले होते. यावेळचे कुस्तीतील भारताचे हे दुसरे पदक आहे. बजरंगच्या आधी अंशू मलिकने रौप्य पदक जिंकले आहे.

अंशू मलिकला रौप्य पदक-

<p>anshu malik</p>
anshu malik

भारतीय कुस्तीपटू अंशू मलिकला फ्रीस्टाइल ५७ किलो गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंशूचा अंतिम फेरीत नायजेरियाच्या ओडानायो फोलासाडोने ३-७ असा पराभव केला. ओडानायोने सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले आहे. त्याचबरोबर अंशूला पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळाले आहे. तिचीही पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा आहे.

भारताचे पदक विजेते

७ सुवर्ण: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॅरा-पॉवरलिफ्टिंग), बजरंग पुनिया

८ रौप्य: संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक

७ कांस्य: गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर

WhatsApp channel