मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CWG 2022 : धनलक्ष्मीनंतर ऐश्वर्या बाबू डोपिंगमध्ये दोषी, दोघी स्पर्धेबाहेर

CWG 2022 : धनलक्ष्मीनंतर ऐश्वर्या बाबू डोपिंगमध्ये दोषी, दोघी स्पर्धेबाहेर

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 21, 2022 10:54 AM IST

अव्वल धावपटू एस धनलक्ष्मी आणि तिहेरी उडीपटू ऐश्वर्या बाबू या डोपिंग चाचणीत दोषी आढळल्या आहेत. या दोन्ही खेळाडूंना राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आहे.

ऐश्वर्या बाबू
ऐश्वर्या बाबू

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ पूर्वी भारताला अजून एक मोठा धक्का बसला आहे. धावपटू एस धनलक्ष्मी हिच्यानंतर आणखी एक भारतीय खेळाडू डोपिंच चाचणीत दोषी आढळली आहे. तिहेरी उडीपटू ऐश्वर्या बाबू हिने उत्तेजक पदार्थ सेवन केल्याचे आढळले आहे.

त्यामुळे आता राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी डोपिंग चाचणीत दोषी आढललेल्या भारतीय खेळाडूंची संध्या दोन झाली आहे. यामध्ये अव्वल धावपटू एस धनलक्ष्मी आणि तिहेरी उडीपटू ऐश्वर्या बाबू यांचा समावेश आहे. 

डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने या दोन्ही खेळाडूंना राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आहे. 

डोपिंग चाचणी ही एक प्रकारची शारिरीक चाचणी आहे. या चाचणीद्वारे, खेळाडूने त्याची कामगिरी सुधारण्यासाठी किंवा शक्ती वाढवण्यासाठी उत्तेजक औषधांचा वापर केला आहे, की नाही हे तपासले जाते.

२४ वर्षीय धनलक्ष्मीचा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ३६ सदस्यीय भारतीय अॅथलेटिक्स संघात समावेश करण्यात आला होता. परंतु अॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट (AIU) द्वारे परदेशात घेतलेल्या डोपिंग चाचणीत ती पॉझिटिव्ह आढळली, त्यानंतर तिला मायदेशी परतावे लागले होते. दुती चंद, हिमा दास आणि सरबानी नंदा यांच्यासह धनलक्ष्मीचे नाव राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील १०० मीटर आणि ४x१०० मीटर रिले संघात समाविष्ट होते.

२८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान पार पडणार स्पर्धा-

या महिन्यात २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान इंग्लंडमधील बर्मिंघम येथे राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा पार पडणार आहे. या खेळांसाठी ३२२ सदस्यीय भारतीय संघ आधीच जाहीर करण्यात आला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) या संघात २१५ खेळाडूंचा समावेश केला आहे. तर १०७ अधिकारी आणि सहाय्यक कर्मचारी असतील.

WhatsApp channel

विभाग