CSK vs SRH Highlights : सीएसकेचा चौथा विजय, डेव्हॉन कॉनवेचे झुंजार अर्धशतक
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CSK vs SRH Highlights : सीएसकेचा चौथा विजय, डेव्हॉन कॉनवेचे झुंजार अर्धशतक

CSK vs SRH Highlights : सीएसकेचा चौथा विजय, डेव्हॉन कॉनवेचे झुंजार अर्धशतक

Apr 21, 2023 07:02 PM IST

CSK vs SRH IPL Score : आयपीएल 2023चा २९ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात झाला. या सामन्यात सामन्यात सीएसकेने ७ विकेट्सनी विजय मिळवला.

CSK vs SRH Live Score
CSK vs SRH Live Score

IPL Cricket Score, CSK vs SRH Indian Premier League 2023 : आयपीएल 2023 च्या २९व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने (csk) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) ७ विेकेट्सनी पराभव केला. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत ७ गडी गमावून १३४ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईने १८.४ षटकांतच लक्ष्य गाठले.

CSK Vs SRH IPL Score updates : 

चेपॉकवर चेन्नईने हैदराबादला हरवले

चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आयपीएल 2023 मध्ये चौथा विजय मिळवला. शुक्रवार (२१ एप्रिल) रोजी एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात सीएसकेने सनरायझर्स हैदराबादचा ८ चेंडू राखून ७ गडी राखून पराभव केला. सीएसकेच्या विजयाचे नायक अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि सलामीवीर डेव्हन कॉनवे होते. जडेजाने ३ विकेट्स घेतल्या, तर कॉनवेने नाबाद ७७ धावा केल्या.

१३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात चांगली झाली. न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या डेव्हॉन कॉनवेने ऋतुराज गायकवाडसोबत पहिल्या विकेटसाठी ११ षटकांत ८७ धावांची भागीदारी केली. या भागीदारीत कॉनवेचे योगदान अधिक होते. डेव्हॉन कॉनवेने ५७ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७७ धावांची खेळी केली.

सीएसकेकडून अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडूने प्रत्येकी ९ आणि मोईन अलीने नाबाद ६ धावा केल्या. तर हैदराबादकडून मयंक मार्कंडेने २ गडी बाद केले.

गुणतालिकेत सीएसके तिसऱ्या स्थानी

चेन्नईचा या मोसमातील सहा सामन्यांमधील हा चौथा विजय आहे. संघाने दोन सामने गमावले आहेत. चेन्नईचा संघ आठ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान आणि लखनौ सुपरजायंट्ससह त्यांचे समान गुण आहेत, परंतु राजस्थानचा नेट रनरेट सर्वोत्तम आहे आणि यामुळे राजस्थान अव्वल आहे. लखनौ दुसऱ्या तर चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर आहे.

CSK vs SRH Live Score : ऋतुराज गायकवाड धावबाद

११व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ऋतुराज गायकवाड धावबाद झाला. कॉनवेचा सरळ शॉटवरील चेंडू उमरानच्या हाताला लागला आणि नॉन-स्ट्रायकर एंडवरील टोकाच्या स्टंपला लागला. त्यावेळी ऋतुराज क्रीझच्या पुढे गेला होता. ऋतुराजने ३० चेंडूत 35 धावा केल्या. १२ षटकांनंतर चेन्नईने एक विकेट गमावून ९१ धावा केल्या आहेत. 

सध्या डेव्हन कॉनवे ४० चेंडूत ५२ आणि अजिंक्य रहाणे दोन धावांवर फलंदाजी करत आहे.

CSK vs SRH Live Score : कॉनवेचे अर्धशतक

१० षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जने एकही विकेट न गमावता ८६ धावा केल्या आहेत. सध्या ऋतुराज गायकवाड २३ चेंडूत ३० धावा तर डेव्हन कॉनवे ३४ चेंडूत ५० धावा करून फलंदाजी करत आहे. कॉनवेने ३३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे सहावे अर्धशतक होते.

CSK vs SRH Live Score : चेन्नईची वेगवान सुरुवात

चेन्नईने चार षटकांनंतर एकही विकेट न गमावता ३२ धावा केल्या आहेत. सध्या ऋतुराज गायकवाड ८ चेंडूत १३ धावा तर डेव्हन कॉनवे १६ चेंडूत १७ धावा करत फलंदाजी करत आहे. दोघांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली.

CSK vs SRH Live Score : चेन्नईचा डाव सुरु 

चेन्नईचा डाव सुरू झाला आहे. डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड क्रीजवर आहेत. संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी दोघांवर असेल. हैदराबादने २० षटकांत ७ गडी गमावून १३४ धावा केल्या आहेत.

CSK vs SRH Live Score : सीएसकेसमोर १३५ धावांचे लक्ष्य

सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत सात गडी गमावून १३४ धावा केल्या आहेत. चेन्नईसमोर १३५ धावांचे लक्ष्य आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादची सुरुवात खराब झाली. या सामन्यात मयंक अग्रवालच्या जागी अभिषेक शर्मा हॅरी ब्रूकसोबत सलामीला आला. या मोसमातील पहिले शतक झळकावणारा हॅरी ब्रूक १८ धावा करून आकाश सिंगच्या हाती झेलबाद झाला.

यानंतर अभिषेकने राहुल त्रिपाठीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी केली. यानंतर जडेजाने अभिषेकला आपल्या जाळ्यात अडकवले. जडेजाने अभिषेकला अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद केले. तो २६ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३४ धावा करून बाद झाला.

यानंतर महिष तीक्षानाने कर्णधार एडन मार्करामला बाद केले. तिक्षानाने मार्करामला यष्टिरक्षक धोनीकरवी झेलबाद केले. त्याला १२ चेंडूत १२ धावा करता आल्या. त्यानंतर जडेजाच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मयंक अग्रवालला धोनीने यष्टिचित केले. तो पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि दोन धावा करू शकला. यानंतर हेनरिक क्लासेन १६ चेंडूत १७ धावा करून मथीषा पाथिरानाच्या गोलंदाजीवर बाद झाला. मार्को यानसेन २२ चेंडूत १७ धावा करून नाबाद राहिला. त्याचवेळी डावाच्या शेवटच्या चेंडूवर नऊ धावा काढून वॉशिंग्टन सुंदर धावबाद झाला. 

चेन्नईकडून जडेजाने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर आकाश सिंग, तीक्षाना आणि पाथिराना यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

CSK vs SRH Live Score : हैदराबादचे ५ फलंदाज बाद

हैदराबाद संघाने ९५ धावांत पाच विकेट गमावल्या आहेत. १३व्या षटकात महिष तीक्षानाने कर्णधार एडन मार्करामला धोनीकरवी झेलबाद केले. त्याला १२ चेंडूत १२ धावा करता आल्या. यानंतर मयंक अग्रवाल फलंदाजीला आला. मयंक ओपनिंगऐवजी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.

पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर म्हणजे १४व्या षटकात जडेजाने मयंकचा झेल सोडला. मात्र, पाचव्या चेंडूवर मयंकला धोनीने यष्टीचीत करून त्याची भरपाई केली. मयंकला दोन धावा करता आल्या. हैदराबादची धावसंख्या १४ षटकांत ५ बाद ९७ अशी आहे. सध्या मार्को जॅन्सन आणि हेनरिक क्लासेन क्रीजवर आहेत.

CSK vs SRH Live Score : राहुल त्रिपाठी-अभिषेक क्रीजवर

सात षटकांनंतर सनरायझर्स हैदराबादने एक गडी गमावून ५५ धावा केल्या आहेत. सध्या राहुल त्रिपाठी १० चेंडूत ९ धावा आणि अभिषेक शर्मा १९ चेंडूत २६ धावा करुन खेळत आहे. 

CSK vs SRH Live Score : हैदराबादला पहिला धक्का

हैदराबादला पहिला धक्का पाचव्या षटकात ३५ धावांवर बसला. आकाश सिंगने हॅरी ब्रुकला ऋतुराज गायकवाडकरवी झेलबाद केले. बॅकवर्ड पॉइंट आणि शॉर्ट थर्ड मॅन यांच्यात ऋतुराजने उत्कृष्ट कमी झेल घेतला. ब्रूक १३ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने १८ धावा काढून बाद झाला. 

CSK vs SRH Live Score : दोन्ही संघ

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन):  हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, आदिल रशीद/अकील हुसेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, मयंक मार्कंडे.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर/कर्णधार), महेश टेकशाना, तुषार देशपांडे, आकाश सिंग, मथीशा पाथिराना

CSK vs SRH Live Score : चेन्नईचा गोलंदाजी करण्याचा निर्णय 

चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने आपल्या प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार इडन मार्करामनेही प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या