मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CSK vs GT Playing 11 : आयपीएल फायनलसाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन, जेतेपदासाठी चेन्नई-गुजरात भिडणार

CSK vs GT Playing 11 : आयपीएल फायनलसाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन, जेतेपदासाठी चेन्नई-गुजरात भिडणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 28, 2023 04:18 PM IST

CSK vs GT IPL 2023 Final Playing 11 : आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ४ सामने झाले आहेत. यापैकी गुजरातने ३ जिंकले आहेत. त्याचबरोबर सीएसकेने या मोसमातील क्वालिफायर सामन्यात गुजरातचा पराभव केला आहे. सीएसकेने १०व्यांदा आयपीएल फायनल गाठली आहे.

CSK vs GT IPL 2023 Final Playing 11
CSK vs GT IPL 2023 Final Playing 11

CSK vs GT, Indian Premier League Final : आयपीएल 2023 चा अंतिम सामना आज २८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात खेळवला जाणार आहे. या आयपीएल मोसमाची सुरुवातही दोन्ही संघांमधील सामन्यानेच झाली होती. यानंतर क्वालिफायर 1 सामनाही चेन्नई आणि गुजरात यांच्यात खेळला गेला. आता हे दोन्ही संघ आज अंतिम सामन्यात पुन्हा आमनेसामने येणार आहेत. म्हणजेच, उभय संघांमधील हा या हंगामातील तिसरा सामना असेल.

आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ४ सामने झाले आहेत. यापैकी गुजरातने ३ जिंकले आहेत. त्याचबरोबर सीएसकेने या मोसमातील क्वालिफायर सामन्यात गुजरातचा पराभव केला आहे. सीएसकेने १०व्यांदा आयपीएल फायनल गाठली आहे. त्यांनी ४ वेळा आयपीएलचे विजेतेपदही पटकावले आहे.

सलामी जोडीवर सीएसकेची मदार

सीएसकेची सलामीची जोडी अप्रतिम फॉर्मात आहे. या मोसमात या जोडीने १ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. गायकवाड आणि कॉनवे हे सीएसकेला धमाकेदार सुरुवात करून देत आहेत. त्याचबरोबर मोईन अली, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे मधल्या फळीत संघाला बळ देतात. शेवटी, रवींद्र जडेजा आणि धोनीमध्ये सामने फिनीश करण्याची क्षमता आहे. गोलंदाजीत दीपक चहर, तुषार देशपांडे आणि पाथिराना हे विकेट घेण्यास सक्षम आहेत.

गुजरातचा संघ संतुलित

गुजरात टायटन्सचा शुभमन गिल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या ४ सामन्यांत त्याने ३ शतके झळकावली आहेत. याशिवाय साई सुदर्शनही संघासाठी सतत धावा करत आहे. मधल्या षटकांमध्ये डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया हे कोणत्याही गोलंदाजाची लाईन-लेन्थ खराब करण्यात माहीर आहेत. मोहम्मद शमी या मोसमात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या मागे राशिद खान आणि आता मोहित शर्मा देखील या यादीत सामील झाले आहेत. एकंदरीत गुजरातचा संघ चेन्नई संघापेक्षा बलाढय़ आहे.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, मोईन अली, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना

इम्पॅक्ट प्लेयर - पाथीराणा

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवाटिया, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), राशिद खान, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद

इम्पॅक्ट प्लेयर - यश दयाल

WhatsApp channel