मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CSK vs GT Final : जडेजाच्या शेवटच्या २ चेंडूवर १० धावा, सीएसके ५व्यांदा आयपीएल चॅम्पियन

CSK vs GT Final : जडेजाच्या शेवटच्या २ चेंडूवर १० धावा, सीएसके ५व्यांदा आयपीएल चॅम्पियन

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 30, 2023 01:43 AM IST

IPL 2023 Final : IPL 2023 च्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने दणदणीत विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सचा (GT) 5 गडी राखून पराभव केला.

CSK Vs GT Final IPL
CSK Vs GT Final IPL

IPL 2023 Final GT vs CSK Final : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा ५ गडी राखून पराभव केला. सीएसकेच्या विजयाचा हिरो ठरला तो रवींद्र जडेजा, त्याने शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. एमएस धोनीच्या टीम चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या बाबतीत धोनीने आता रोहित शर्माची बरोबरी केली आहे

६ चेंडूत १३ धावांची गरज

चेन्नई संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती. गुजरातकडून हे षटक टाकण्याची जबाबदारी मोहित शर्माकडे सोपवण्यात आली होती. तर क्रीजवर शिवम दुबे होता. मोहितने पहिल्या चेंडूवर एकही धाव दिली नाही. यानंतर ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर फक्त १ धाव आली. आता चेन्नईला ४ चेंडूत १२ धावांची गरज होती. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर १-१ धावा आली.

आता सीएसकेला विजयासाठी शेवटच्या दोन चेंडूंवर १० धावांची गरज होती. तेव्हा रवींद्र जडेजा क्रीजवर होता. त्याने मोहित शर्माच्या चेंडूवर प्रथम षटकार आणि नंतर चौकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला.

या सामन्यात गुजरातने २१५ धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार हे लक्ष्य १५ षटकांत १७१ धावा करण्यात आले. प्रत्युत्तरात चेन्नई संघाने ५ विकेट्सवर १७१ धावा करत सामना जिंकला. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने २५ चेंडूत सर्वाधिक ४७ धावा केल्या. शिवम दुबेने ३२ आणि अजिंक्य रहाणेने झटपट २७ धावा केल्या. गुजरातकडून मोहित शर्माने ३ आणि नूर अहमदने २ बळी घेतले.

या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने ४ गडी गमावून २१४ धावा केल्या. साई सुदर्शनने संघासाठी ४७ चेंडूत ९६ धावांची तुफानी खेळी केली. त्याने ६ षटकार आणि ८ चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट २०४.२५ होता. सुदर्शनशिवाय ऋद्धिमान साहाने ५४ आणि शुभमन गिलने ३९ धावा केल्या. चेन्नईकडून मथिशा पाथिरानाने २ बळी घेतले.

WhatsApp channel