मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डो झाला ३९ वर्षांचा, त्याने रचलेल्या ५ मोठ्या विक्रमांवर एक नजर

Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डो झाला ३९ वर्षांचा, त्याने रचलेल्या ५ मोठ्या विक्रमांवर एक नजर

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 05, 2024 01:28 PM IST

Happy Birthday Cristiano Ronaldo: फुटबॉल विश्वातील स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आज त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldo (REUTERS)

Cristiano Ronaldo Turns 39: फुटबॉल विश्वातील स्टार आणि पोर्तुगालचा आयकॉन रोनाल्डो आज त्याचा ३९वा वाढदिवस साजरा करत आहे. फुटबॉलच्या इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेड, रियल माद्रिद आणि युव्हेंटस येथे आपल्या दमदार खेळद्वारे अनेक अव्वल दर्जाच्या लीगचे विजेतेपद पटकावले. "मी विक्रमाचा पाठलाग करत नाही. तर, विक्रम माझ्या मागे लागतात," असे ख्रिस्तियानो रोनाल्डोने यापूर्वी म्हटले आहे. रोनाल्डोच्या वाढदिवसानिमित्त त्याने रचलेल्या पाच विक्रमांवर एक नजर टाकुयात.

हॅटट्रिक किंग!

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये १० हॅटट्रिक करणारा रोनाल्डो पहिला खेळाडू ठरला आहे. पोर्तुगालने २०२१ मध्ये लक्झेंबर्गवर ५- ० असा विजय मिळवताना विक्रमी १० वी हॅटट्रिक नोंदवून पोर्तुगीज गोल- मशीनने ही आश्चर्यकारक कामगिरी केली. रोनाल्डोने पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये ९ हॅटट्रिक करणाऱ्या स्वेन रायडेलला मागे टाकले.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल

रोनाल्डोने २०२१ मध्ये ११० क्रमांकाचा गोल नोंदवत अली दाईला मागे टाकले. पोर्तुगालकडून रोनाल्डोने केलेल्या दोन गोलच्या जोरावर त्याने दाईचा १०९ गोलचा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये रोनाल्डोच्या नावावर ११८ हून अधिक गोल आहेत. पोर्तुगालच्या या दिग्गजाने २०२१ मध्ये आयर्लंड प्रजासत्ताकाविरुद्ध दोन गोल करून इतिहास रचला.

तीन चॅम्पियन्स लीग फायनलमध्ये गोल करणारा एकमेव खेळाडू

रोनाल्डोला मिस्टर युएफा चॅम्पियन्स लीग म्हणून ओळखले जाते. रियाल माद्रिद आणि युव्हेंटसच्या या माजी स्टारने चॅम्पियन्स लीगच्या तीन फायनलमध्ये गोल केले. चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. अंतिम लढतीत रोनाल्डोने मॅन युनायटेडकडून एक आणि रियल माद्रिदकडून तीन गोल केले आहेत.

Rohan Bopanna : रोहन बोपन्ना ४३ व्या वर्षी बनला चॅम्पियन, पटकावले ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद

 

चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक गोल

पोर्तुगालचा कर्णधार क्लब स्तरावरील युरोपच्या सर्वात मोठ्या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. या स्पर्धेत रोनाल्डोच्या नावावर १४० गोल आहेत. या अनुभवी फॉरवर्डने आपल्या कारकिर्दीत पाच वेळा ही प्रसिद्ध ट्रॉफी जिंकली आहे. रोनाल्डो हा चॅम्पियन्स लीगमधील सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. रोनाल्डोने चॅम्पियन्स लीगमध्ये १८३ सामने खेळले.

कारकिर्दीत 800 गोल करणारा पहिला खेळाडू

याआधी रोनाल्डो क्लब आणि देशासाठी ८०० गोल करणारा पहिला खेळाडू ठरला होता. मॅन युनायटेडच्या माजी स्टारने नोव्हेंबर २०२२ मध्ये ही कामगिरी केली होती. रेड डेव्हिल्स आणि आर्सेनल यांच्यातील प्रीमियर लीग सामन्यात रोनाल्डोने हा ऐतिहासिक गोल केला. त्याने गनर्सविरुद्ध आपल्या संघासाठी मॅच विनर देखील गोल केला.

WhatsApp channel

विभाग