चीनहून सौदीला सायकलने पोहोचला, रोनाल्डोला भेटण्यासाठी इतक्या दिवसांत पूर्ण केला १३ हजार किमीचा प्रवास
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  चीनहून सौदीला सायकलने पोहोचला, रोनाल्डोला भेटण्यासाठी इतक्या दिवसांत पूर्ण केला १३ हजार किमीचा प्रवास

चीनहून सौदीला सायकलने पोहोचला, रोनाल्डोला भेटण्यासाठी इतक्या दिवसांत पूर्ण केला १३ हजार किमीचा प्रवास

Updated Oct 28, 2024 03:04 PM IST

Cristiano Ronaldo Fan Travelled 13000 km on Bicycle : रोनाल्डोचा २४ वर्षीय चाहता गोंग याने चीन ते सौदी अरेबिया असा प्रवास सायकलवरून केला. या चाहत्याने सुमारे ७ महिन्यांत हा प्रवास पूर्ण केला.

चीन ते सौदी ७ महिने सायकल चालवली, १३००० किलोमीटरचा प्रवास करून रोनाल्डोला भेटला जबरा फॅन!
चीन ते सौदी ७ महिने सायकल चालवली, १३००० किलोमीटरचा प्रवास करून रोनाल्डोला भेटला जबरा फॅन!

फुटबॉल हा जगभरात सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ जगातील बहुतेक देशांमध्ये खेळला जातो. तर पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो हा फुटबॉलचा सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. अशातच आता या दिग्गज फुटबॉलपटूचा एक अनोखा जबरा फॅन समोर आला आहे. या चाहत्याने रोनाल्डोला भेटण्यासाठी ७ महिन्यांत सायकलवरून १३००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. गोंगअसे या चाहत्याचे नाव आहे.

रोनाल्डोचा २४ वर्षीय चाहता गोंग याने चीन ते सौदी अरेबिया असा प्रवास सायकलवरून केला. या चाहत्याने सुमारे ७ महिन्यांत हा प्रवास पूर्ण केला. वृत्तानुसार, रोनाल्डोच्या या चाहत्याने १८ मार्च रोजी आपला प्रवास सुरू केला आणि २० ऑक्टोबर रोजी अल नसर फुटबॉल क्लबसमोर क्रिस्टियानो रोनाल्डोची भेट घेतली.

६ देशांचा प्रवास केला

वृत्तानुसार, रोनाल्डोच्या चाहत्याने १३ हजार किलोमीटरच्या प्रवासात एकूण ६ देश पार केले. या ६ देशांमध्ये जॉर्जिया, इराण आणि कतार या देशांचाही समावेश होता. आपल्या प्रवासादरम्यान गोंगला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला. विविध देशांच्या भाषांमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. याशिवाय खाद्यपदार्थांच्या वाढत्या आणि घसरलेल्या किमतींनीही गोंगला खूप अडचणीत टाकले, मात्र त्याने हार न मानता सायकलवरून प्रवास पूर्ण केला.

वृत्तानुसार, ऑगस्टमध्ये अमेरिकेत असताना गोंग आजारी पडला होता. मात्र, तेथे त्याच्यावर रुग्णालयात मोफत उपचार करण्यात आले. 

दरम्यान, रोनाल्डो फेब्रुवारीमध्ये चीनच्या दौऱ्यावर जाणार होता, पण त्याच्या दुखापतीमुळे हा दौरा रद्द झाला. अशा स्थितीत गोंगची रोनाल्डोला पाहण्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. मग यानंतर गोंगने रोनाल्डोला कोणत्याही किंमतीत भेटण्याचे ठरवले आणि त्याला ही सायकलवरून प्रवास करून रोनाल्डोला भेटायला जाण्याची आयडीया सुचली.

भेटण्यासाठी काही दिवस वाट पहावी लागली

गोंग १० ऑक्टोबर रोजी रियाधला पोहोचला होता, परंतु रोनाल्डला भेटण्यासाठी त्याला काही दिवस प्रतीक्षा करावी लागली. अल नासरच्या कर्मचाऱ्यांनी रोनाल्डोला भेटण्यासाठी गोंगची व्यवस्था केली. अखेरीस गोंग रोनाल्डोला भेटला आणि जर्सीवर ऑटोग्राफ घेतला.

या भेटीनंतर गोंग खूप आनंदी दिसत होता. याआधी गॉन्गला रोनाल्डला मोफत लाइव्ह पाहण्याची संधी मिळाली होती. दुसऱ्या एका चाहत्याने गोंगला मोफत तिकीट दिले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या