मराठी बातम्या  /  क्रीडा  /  रोनाल्डोला डान्स करताना पाहिलंय का? स्टार फुटबॉलपटूचा व्हिडीओ व्हायरल
Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldo

रोनाल्डोला डान्स करताना पाहिलंय का? स्टार फुटबॉलपटूचा व्हिडीओ व्हायरल

22 June 2022, 20:39 ISTRohit Bibhishan Jetnavare

रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) मँचेस्टर युनायटेडसाठी २४ गोल केले होते. या क्लबसाठी तो गेल्या मोसमात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला होता.

स्टार फुटबॉलपटू क्रिस्टीयानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo Dance Video) याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रोनाल्डो डान्स करताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एप्रिल ते मे दरम्यान जवळपास सर्व प्रमुख फुटबॉल लीग स्पर्धा या संपतात. तर नवीन सीझन हे काही जुलैपूर्वी सुरू होत नाहीत. अशा परिस्थितीत फुटबॉलपटूंसाठी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी हा वेळ सर्वोत्तम मानला जातो.

अशातच सर्वोत्तम फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) हा देखिल स्पेनमधील माझुर्का या बेटावर सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तो त्या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्या एन्जॉय करतो आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोनाल्डो हा त्याचा आपला मुलगा क्रिस्टियानो रोनाल्डो जूनियर याचा १२ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी तेथे गेला आहे. या दौऱ्यात त्याच्या कुटुंबातील काही खास सदस्यही त्याच्यासोबत आहेत.

डान्स व्हिडिओमध्ये रोनाल्डोसह त्याचा मुलगा आणि त्याची भाची एलिसिया हे सर्वजण डान्स करताना दिसत आहेत. ''डेसनरोला बाते जोगा डी लडिन'' या ट्रेंडिंग गाण्यावर ते सालसासारखी हिप मूव्हज करताना दिसत आहेत.

गेल्या इंग्लीश लीग मोसमात रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेडसाठी २४ गोल केले होते. या क्लबसाठी तो गेल्या मोसमात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला होता. वयाच्या ३७ व्या वर्षीही तो दमदार कामगिरीच्या बळावर एकामागून एक नवीन रेकॉर्ड गाठत आहे. या वयातही तो पोर्तुगालच्या संघासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे.